नवरा-बायको विनोद | husband-wife jokes marathi | navra- bayko funny status

शेअर कर मित्रा

नवरा-बायको विनोद मराठी / Husband-wife jokes marathi.😂

Husband-wife jokes marathi
Husband-wife jokes marathi

 

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही  नवरा-बायको विनोद घेऊन आलो आहोत.प्रत्येक नवरा बायको मध्ये मजेशीर नोक-झोक चालूच असते.हे नवरा बायको funny जोक्स तुम्हाला नक्की हसवतींन.हे मराठी विनोद नवरा आपल्या बायकोला आणि बायको आपल्या नवऱ्याला आपल्या whatsapp वरून share करू शकतात.

Best husband-wife jokes in marathi / नवरा-बायको सर्वोत्तम विनोद मराठी.

पत्नी ने नेट रिचार्ज करण्यासाठी सांगितलं …
… ….
पति ने ऑनलाइन रिचार्ज करुन दिलं…
……
बिचारा सकाळपासून टोमणे ऐकतोय…
ऑनलाइन का केलं?
ऑनलाइन वस्तू खराब येतात …

जेव्हा बायको म्हणते ,,,
“काय म्हणालात…??”
😂
की याचा अर्थ असा नाही की तिने ऐकले नाही, तर ती तुम्हाला तुमचे वाक्य बदलण्याची 1 संधी देत असते.

पती – काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस
पत्नी – तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.
पती – कसला गैरसमज ?
पत्नी – हेच की मी झोपेत होते म्हणून….
एकदा नवरा बायको
Discovery बघत
असतात.
channel वर म्हैस
दिसते…
नवरा: ती बघ तुझी
नातेवाईक
बायको: Aiyya…
सासूबाई .
पत्नी – माझ्या पायात मोठा काटा
रुतल्याच स्वप्न
सारख पडत आहे.
पती – मग. त्यात एवढे
घाबरण्यासारखं काय झाले?
पायात चप्पल घालून झोपत जा ……
नवरा : किती काम करशील,
आपण तुझ्यासाठी एक कामवाली
ठेऊ..
बायको : अजिबात नाही..
आठवत नाही का, मी सुद्धा
तुमच्याकडे कामवालीच होते..
लोकं उगाचच म्हणतात की
“बायका कधीच आपली
चूक मान्य करत नाहीत”
माझी बायको तर रोजच
मान्य करते,
चूक झाली तुमच्याशी लग्न
न करून…
बायकोला तिळगुळ देणे
‘ ही आपाली नवऱ्याची श्रद्धा आहे….
तिळगुळ घेतल्या नंतर
बायकोने गोड गोड बोलणे
ही अंधश्रद्धा आहे..
पति :- आज घर आवरलेलं
आहे . तुझ व्हाट्सअप बंद होंत
का आज ?
पत्नी :- नाही हो.
फोनचा चार्जर सापडत नव्हता
तोच शोधण्याच्या नादात घर
आवरलं गेल..!
जर विवाहित पुरुषाचा
whatsapp चा
लास्ट सिन रात्री 3 असेल तर
याचा अर्थ,
तो तर झोपला असेल,पण
त्याच्या बायकोने त्याचं
whatsapp चेक
केलं असेल.
बायको तिच्या मैत्रिणीला : काल दिवसभर नेट
चालत नव्हते.
मैत्रिण : मग काय केले ?
बायको : काही नाही , नवर्याबरोबर गप्पा
मारत होते ,
” बरा वाटला गं स्वभावाने “
बायको – लग्नानंतर तुमचं आता
प्रेमच राहिलं
नाही माझ्यावर.
नवरा – परीक्षा पास झाल्यावर
कोणी अभ्यास करतं
का येडे?
बायको: अहो, ऐका ना. हे असं पांढऱ्या
पायजमावर पिवळा कुर्ता नका घालत जाऊ
बरं…
नवरा: का?
बायको: परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण
म्हणाली की, “तुझा वरण भात आला बघ.”
बायको: अहो माझ्याकडे तोंड करून
झोपा, मला भीती वाटतेय
नवराः हा म्हणजे मी भीतीने
मेलो तरी चालेल.
एका बाईची तिसऱ्यांदा ड्रायव्हिंग टेस्ट
झाली तरी fail चं झाली
कारण….
RTO – वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सखा भाऊ आणि एक बाजूनं तुमचा नवरा आला तर काय माराल?
महिला – नवरा ….!!!!
RTO – वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो ब्रेक मारायचा आहे ब्रेक…….😂
बायको – माझा मोठेपणा बघा ….
मी तुम्हाला न बघताच तुमच्याशी लग्न केलं.
नवरा – त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ ….
मी तुला बघून सुध्दा तुझ्याशिच लग्न केलं.
बायको(लाडालाडात येऊन) – जा तुम्ही तुमचं माझ्यावर प्रेमच उरलं नाही.
नवरा (सावधपणे) – तुला अस का वाटतंय जानू…?
बायको – मग? पूर्वी कसे मला माझी रसमलाई,माझी
रबडी,माझी बासुंदी,असं म्हणायचात …….
आता नाही म्हणत …
आम्ही नाही जा…
👇
नवरा(समजावत) – अगं, दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार…?
(भांड फेकून मारलं बाईने)
आज माणुसकीवरून विश्वासच उडाला
ज्या मित्राच्या लग्नात आम्ही आया है राजा
लोगो रे लोगो वर नाचलो होतो.
तोच मित्र रोज बायकोच्या अंथरुणाच्या
घड्या घालतोय.
बायको – (वैतागून) तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय.
नवरा – अच्छा ,आता मला कळलं की तू इतका वेळ
माझे डोके का खातेस आहेस.
बायको-तुम्ही काल खूप प्यायला होता.
नवरा-नाही गं.
बायको-तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता
रडू नको सगळं ठीक होईल…..
माणूस – साहेब माझी बायको हरवलीय ….
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे  पोलिस स्टेशन नाही..
तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ….
माणूस – च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ
तेच कळत नाही…..
नवरा बायको जेवायला बसलेले असतात
बायको-लोणच्याची बरणी घेऊन या.
नवरा(किचन मधून)-कुठे आहे बरणी सापडत नाहीये.
बायको-तुमचं घरात लक्ष असतंच कुठे?
मला माहिती होतं ,तुम्हाला बरणी सापडणार
नाही बरणी…
म्हणूनच मी अगोदरच बरणी घेऊन आले.
बायको आपल्यावर खूपच प्रेम करते
असे वाटत असेल तर ..
जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात
पुसुन पहा.
तुमचा सगळा गैरसमज दूर होईल…..!!!!

 

Husband-wife jokes for whatsapp in marathi.

नवऱ्याने बायकोला केलेला भावपूर्ण मेसेज
माझं प्रेम राफेल विमानासारखं आहे,
शेवटपर्यंत त्याची तुला त्याची किंमत कळणार
नाही.😂
अमेरिकेतली जोडपी झोपताना
‘Good night my love’ अस म्हणून
झोपतात.
इंग्लंड मधील जोडपी झोपताना
‘Sweet Dream Darling ‘ असं म्हणून
झोपतात.
आणि आपल्या भारतातील जोडपी ….?
‘सिलिंडर खालून बंद केलं का हो’.
माणसाला काय हवं असत ?
गुटगुटीत मुलं आणि सडपातळ बायको,
पण नशिबाचे फासे नेहमी उलटे पडतात.
बायको गुटगुटीत आणि मूल किडकिडीत…
कॉन्फिडन्स
बायको – आज कॉलनीत वाद घालण्याची
स्पर्धा होती….
नवरा – अरे वा मग दुसरी कोण आली….?
रेशमी सदऱ्याला नाही बक्कल
बबनरावांना आहे टक्कल
पण डोक्यात नाही अक्कल.
लग्न झालेला पुरुष पतंगासारखा
असतो
जरा थोडी धील दिली की
शेजारच्या गच्चीवर गेलाच म्हणून समजा.😂
बायकोमुळे त्रासून गेलेला नवरा त्याच्या घरच्या
कुत्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो…
तुझ्यात आणि माझ्यात फक्त दोन पायांचा
फरक आहे.
नवऱ्याने गोनी भरून आलं आणले,
बायको- ने विचारले एव्हढे आलं कशाला?
नवरा – अग तुझ्या भावाचे लग्न आहे ना….
बायको – मग लग्न आणि आलंचा काय संबंध आहे.
नवरा – अंग, तुझ्या बापाने पत्रिकेत लिहिलय
‘लग्नाला आलंच पाहिजे’
(याला म्हणतात जावई)
बायकोचे निर्णय चुकीचेच असतात
असे सांगण्यापूर्वी😂
.
.
.
तिने तुमच्याशी लग्न केलंय हे विसरु नका.
जर आपली बायको किती फास्ट पळते हे पहायचे
असेल तर ..
फक्त जोरात ओरडा ‘दूध ओतू चाललंय’.
आणि जर आपला नवरा किती फास्ट पळू शकतो
हे बघायचे असेल तर..
फक्त जोरात ओरडा ‘मोबाईल वाजतोय उचलू का ?’
पप्पूच लग्न झालं आणि त्यांचा संसार सुरु झाला
एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो..?
तू माझ्यात असं काय पाहिले का direct हो म्हणालीस?
पप्पूची बायको – मी तुम्हाला भांडे घासताना पाहिले.
एका पत्नीची समस्या
मी माझ्या ह्यांना विचारत असते की
तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती?
पण……
हे काहीच बोलत नाही फक्त माझ्याकडे
बघत राहतात.
#उन्हाळा
बायको – कुठे निघलांत?
नवरा – गच्चीत,चिमण्यांना पाणी ठेवायला …
किती कडक उन्हाळा आहे .
बायको – या खाली,सगळ्या चिमण्या माहेरला
गेल्या आहेत.
नवरा बायकोचा हात धरून बाजारात फिरत असतो
ते पाहुन त्याचा मित्र त्याला म्हणतो तुमच्या दोघामध्ये किती प्रेम आहे लग्नाला इतके वर्षे होऊन सुध्दा ,हातात हात घेऊन फिरतायत!
नवरा- अरे तसे काही नायरे येड्या,तिचा हात नाही धरला तर कोणत्या पण दुकानात शिरते ती!!!
पेट्रोल पंपावर गेल्यावर
बायकोला लांब का
थांबवतात ?
कारण तिथे लिहिलेले असते
स्फोटक पदार्थ लांब ठेवा…
-स्त्रीया बोलल्याशिवाय
निवांत बसू शकत नाहीत.
आणि पुरूष
बसल्याशिवाय
निवांत बोलू शकत नाहीत !!
पुणेरी couple
नवरा (बायकोला चिडवत म्हणाला):काल
रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली
होती….
बायको: एकटीच आली असेल….
नवराःहो तुला कसं माहित….?
बायको:कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात
आला होता….

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी नवरा-बायको विनोद | husband-wife jokes marathi | navra- bayko funny status असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद 🙏

Please :- आम्हाला आशा आहे की  नवरा-बायको विनोद | husband-wife jokes marathi | navra- bayko funny status
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या बायको & नवऱ्या  बरोबर  share करायला विसरु नका…….👍

 

नोट :नवरा-बायको विनोद | husband-wife jokes marathi | navra- bayko funny status या दिलेल्या लेखातील नवरा बायको जोक्स,नवरा बायको फनी स्टेटस,नवरा बायको विनोद इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

शेअर कर मित्रा

Leave a Comment