म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी? | How To Invest In Mutual Funds In Marathi?

म्युच्युअल फंड गुंतवणूक माहिती मराठीत / Mutual Fund Investment Information in Marathi.

How To Invest In Mutual Funds In Marathi

म्युच्युअल फंड हा स्टॉकनंतरचा दुसरा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. म्युच्युअल फंडामध्ये स्टॉकच्या तुलनेत कमी जोखीम असते कारण पैसे अनेक कंपन्यांमध्ये गुंतवले जातात आणि एक्स्पर्ट फंड मॅनेजर त्यांचे व्यवस्थापन करतात. तुम्हाला शेअर बाजाराचे ज्ञान नसेल किंवा गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्या शोधण्यासाठी आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी पुरेसा वेळ नसेल, तर म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे.

त्यामुळे तुम्ही दरमहा 15 ते 20,000 रुपये कमवत असले तरीही तुम्ही म्युच्युअल फंडात किमान ₹ 1000 चा SIP सुरू केली पाहिजे. ही छोटी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जाईल आणि दीर्घकाळानंतर तुमच्याकडे खूप मोठी रक्कम येऊ शकते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असण्याची गरज नाही. तुम्ही ₹100 ₹500 ₹1000 इतक्या कमी किंमतीपासून सुरुवात करू शकता. तर, या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी? याविषयीची माहिती देणार आहोत. त्यामध्ये आम्ही तुम्हाला वन टाइम गुंतवणूक आणि SIP सेट करण्याची संपूर्ण प्रक्रियेची माहिती देणार आहे.

मी म्युच्युअल फंड कसे खरेदी करू ?/ How To Invest In Mutual Funds In Marathi

 • आजच्या पोस्टमध्ये आपण एंजेल वन ॲपमधून म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी याविषयी माहिती देणार आहोत.
 • म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एंजेल वनचे अकाउंट ओपन करावे लागेल.
 • या एका खात्याद्वारे तुम्ही स्टॉक, म्युच्युअल फंड, गोल्ड बाँड, आयपीओ या सर्वांमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही एंजेल वन खाते पूर्णपणे मोफत उघडू शकता.
 • तुमचे एंजेल वन खाते उघडताच, तुम्हाला एंजेल स्पार्क ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल.
 • एंजेल स्पार्क ॲपमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन कराल, त्यानंतर तुम्हाला त्या ॲपचा यूजर इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड हा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
 • यामध्ये तुम्हाला विविध कॅटेगरीतील म्युच्युअल फंड पाहायला मिळतील. उदाहरणार्थ,

टॉप रेटेड म्युच्युअल फंड

ज्यांना टॉप रेटिंग देण्यात आले आहे, ते तुम्हाला टॉप रेटेडमध्ये सापडतील. तुम्ही यावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला टॉप रेटेड म्युच्युअल फंड दिसतील. मागील तीन वर्षांचे त्यांचे रिटर्न तुम्ही येथे पाहू शकता.

हाय रिटर्न्स म्युच्युअल फंड

हाइ रिटर्न्स तुम्ही यावर क्लिक केल्यास, उच्च परतावा देणारे म्युच्युअल फंड तुमच्यासमोर दिसतील. हे उच्च परतावा देणारे म्युच्युअल फंड आहेत. मागील तीन वर्षांचे या म्युच्युअल फंडचे रिटर्न तुम्ही येथे पाहू शकता.

टॅक्स सेविंग म्युच्युअल फंड :-

ज्याचा लॉक-इन कालावधी किमान 3 वर्षांचा आहे. जर तुम्ही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर पुढील 3 वर्षे तुम्ही त्यातून पैसे काढू शकणार नाही.

लो रिस्क म्युच्युअल फंड :-

लो रिस्क म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला कमी जोखीम असलेले म्युच्युअल फंड मिळतील, परंतु त्यांचा परतावाही खूप कमी असणार आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी किती परतावे दिले हे तुम्ही पाहू शकता.

सेक्टर बेट्स :-

जर तुम्हाला तंत्रज्ञान, ऑटो, बँकिंग यासारख्या विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सेक्टर बेट्स म्युच्युअल फंड निवडू शकता. जर तुम्ही या म्युच्युअल फंडांद्वारे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक केली तर तुम्ही त्यांचा रिटर्न्स देखील येथे पाहू शकता.

म्युच्युअल फंड कसे शोधून त्यात इन्व्हेस्टमेंट कशी करावी?

जर तुम्हाला कोणत्याही म्युच्युअल फंडाचे नाव माहित असेल तर तुम्ही ते सर्च बारमध्ये टाकून देखील शोधू शकता.

उदाहरण, आम्ही सर्च बारमध्ये पराग पारीख फ्लेक्स म्युच्युअल फंड टाकले तर या म्युच्युअल फंडचे नाव आपल्या समोर येईल. त्या म्युच्युअल फंडच्या नावावर क्लिक करून तुम्ही त्याची माहिती पाहू शकता, म्हणून प्रथम तुम्हाला हे ठरवावे लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायचे आहेत. जसे टॉप रेटेड म्युच्युअल फंड, ज्याला टॉपची रेटींग दिलेली आहे हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन राहू शकतो.

जसे की ICICI Prudential Bluechip Fund Direct Plan Growth, SBI Large And Midcap Fund Direct Plan Growth, असे काही टॉप रेटेड म्युच्युअल फंड तुम्हाला पाहायला मिळतील.

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पहिले म्युच्युअल फंडाचे रेटिंग दिसेल. या म्युच्युअल फंडाला 5 star रेटिंग देण्यात आले आहे. यानंतर तुम्ही येथे खाली चार्ट पाहू शकता. यामध्ये तुम्ही मागील 3 वर्षांचा, 5 वर्षाचा ऑल टाइमचा चार्ट पाहू शकता. तुम्ही या म्युच्युअल फंडात किमान किती एकवेळ / वनटाइम गुंतवणूक करू शकता आणि SIP मध्ये किमान किती गुंतवणूक करू शकता हे तुम्ही येथे पाहू शकता.

लॉक इन पीरियड

लॉक इन पीरियड ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या म्युच्युअल फंडात लॉक इन पीरियड नाही ना हे तुम्हाला तपासावे लागेल. जर तुम्ही सिलेक्ट केलेल्या म्युच्युअल फंडला लॉक इन पीरियड नसेल तर त्यातून तुम्ही तुमचे पैसे कधीही काढू शकता.

कॅल्क्युलेटर

कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही तुमच्या परताव्याची गणना करू शकता. यामध्ये तुम्हाला एसआयपी आणि वनटाइम कॅल्क्युलेटर दोन्ही पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, जर तुम्हाला या म्युच्युअल फंडात दरमहा ₹ 5000 ची गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही येथे ₹ 5000 निवडाल. यानंतर तुम्ही कालावधी निवडाल,तुम्हाला किती काळ गुंतवणूक करायची आहे.

जसे तुम्हाला 10 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही येथे 10 वर्षे निवडा. त्यानंतर इथे तुमचा एकूण रिटर्न खाली तुमच्या समोर येईल. हे फिक्स रिटर्न नाहीत, परंतु मागील कामगिरीच्या आधारावर, तुम्हाला कल्पना देण्यात आली आहे की जर तुम्ही गेल्या 10 वर्षांपासून दरमहा ₹ 5000 ची गुंतवणूक केली असेल, तर आतापर्यंत तुमची रक्कम इतकी झाली असती, त्यामुळे मागील कामगिरीच्या आधारावर पुढे रिटर्न किती येऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

म्युच्युअल फंडात एक वेळ गुंतवणूक कशी करावी?

जर तुम्हाला एकदाच / वन टाइम गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही येथे वन टाइम कॅल्क्युलेटर देखील वापरू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एकदा म्युच्युअल फंडात ₹ 5,00,000 ची गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही येथे 5,00,000 टाका.

यानंतर तुम्हाला कालावधी निवडायचा आहे. तुम्हाला किती काळ गुंतवणूक करायची आहे. तुम्ही या म्युच्युअल फंडामध्ये ₹5,00,000 गुंतवल्यास आणि पुढील 10 वर्षांसाठी ठेवल्यास तुम्हाला मिळू शकणारी मॅच्युरिटी रक्कम खाली तुम्हाला दिसेल.

यानंतर, तुम्ही खाली स्क्रोल केल्यास, तुम्हाला अधिक तपशील मिळतील. जसे की या म्युच्युअल फंडाची AUM किती आहे? म्हणजे Assets Under Management किती आहे. तुम्ही येथे खर्चाचे प्रमाण / Expenses Ratio पाहू शकता. खाली तुम्हाला एक्झिट लोड दिसेल.

जर तुम्ही या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले आणि 1 वर्षापूर्वी ते रिडीम केले म्हणजे तुमचे पैसे काढले तर तुम्हाला 1% एक्झिट लोड भरावा लागेल आणि जर तुम्ही 1 वर्षानंतर म्हणजे 1 वर्षानंतर पैसे रिडीम केले तर तुम्हाला कोणताही एक्झिट लोड भरावा लागणार नाही.

म्युच्युअल फंडात किती टॅक्स भरावा लागतो?

जर तुम्ही 1 वर्षापूर्वी यातून पैसे काढले तर तुम्हाला 15% कर भरावा लागेल, जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे आणि जर तुम्ही 1 वर्षानंतर म्युच्युअल फंड विकून पैसे काढले तर त्यातून तुम्हाला जो काही नफा मिळेल त्यावर 10% कर भरावा लागेल. याला दीर्घकालीन भांडवली नफा कर म्हणतात.

एंजेल वन ॲपवर म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?

म्युच्युअल फंड अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, त्यामुळे स्टॉकच्या तुलनेत जोखीम कमी होते, त्यामुळे तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेल्या म्युच्युअल फंडात कोणत्या कंपनीत, किती टक्के गुंतवणूक केली आहे याची संपूर्ण माहिती येथे मिळेल. त्यामुळे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ₹ 1000 जरी गुंतवले तरी ते तुमच्या त्या सर्व कंपन्यांमध्ये गुंतवले जाईल.

 1. सर्वप्रथम तुम्हाला हे ठरवावे लागेल की तुम्हाला कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे. किती इन्व्हेस्टमेंट करायची, तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची किंवा SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे.
 2. तुम्हाला एंजेल वन ॲपवर आम्ही वर सांगितलेल्या प्रमाणे टॉप रेटेड, किंवा कमी रिस्कवाले अश्या ज्यापण कॅटेगिरी मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात.
 3. तुम्हाला एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंड कंपनीचे नाव माहिती असेल तर तुम्ही सर्च बारमध्ये त्या कंपनीचे नाव टाकून सुद्धा गुंतवणूक करू शकतात.
 4. तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची म्युच्युअल फंड कंपनीच्या नावावर क्लिक करायचे आहे.
 5. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय मिळतील, जर तुम्हाला SIP करायची असेल तर तुम्ही तो ऑपशन निवडाल आणि जर तुम्हाला एक वेळ / One time गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तो ऑप्शन निवडाल.
 6. तुम्हाला त्या म्युच्युअल फंडमध्ये किती गुंतवणूक करायची आहे ती रक्कम तुम्ही इथे टाकू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही येथे ₹ 500,₹ 100 टाकू शकतात.
 7. यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन चार्जेस किती भरावे लागतील हे तुम्ही येथे पाहू शकता. यानंतर, तुम्ही कोणत्याही UPI ॲप्लिकेशनद्वारे पेमेंट करू शकता किंवा तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे देखील पेमेंट करू शकता.
 8. तुम्हाला त्याच बँक खात्यातून पेमेंट करावे लागेल जे तुम्ही एंजेल वनमध्ये जोडले आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँक जोडले असेल तर तेच टाका, त्याच बँकेच्या नेटबँकिंगवर तुम्हाला पेमेंटसाठी रीडायरेक्ट केले जाईल.
 9. येथून तुम्ही नेटबँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड टाकून पेमेंट पूर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला पेमेंट यशस्वी झाल्याचे दिसेल आणि तुमची ऑर्डर प्लेस झाली आहे.
 10. आता तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवले जातील. येथे तुम्ही तुमच्या ऑर्डरची स्थिती पाहू शकता. ऑर्डर एक्सचेंजला यशस्वीरित्या पाठवण्यात आल्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ अपडेट केला जाईल.

एंजेल वन ॲपवर पैसे कसे ऍड करावे व काढावे?

तुम्ही स्टॉकमध्ये गुंतवणूक करता तेव्हा, तुम्हाला तुमच्या एंजेल वन वॉलेटमध्ये बॅलेन्स जोडणे आवश्यक आहे. मग तुम्ही एंजेल वन वॉलेट बॅलेन्समधून स्टॉक खरेदी केऊ शकता आणि जेव्हा तुम्ही ते स्टॉक विकाल, तेव्हा निधी तुमच्या एंजेल वनच्या वॉलेटमध्ये येईल. तिथून तुम्हाला पाहिजे असलेली रक्कम विड्रॉ करायची आहे.

एंजेल वनवर म्युच्युअल फंडामध्ये, तुम्ही थेट तुमच्या बँक खात्यातून म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करता आणि जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडांची विक्री करता तेव्हा रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते.

FAQ

म्युच्युअल फंड ही चांगली गुंतवणूक आहे का?

स्टॉक / शेअर खरेदी करण्यापेक्षा म्युच्युअल फंड ही अधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

सर्वोत्तम म्युच्युअल फंड कोणते आहेत?

ICICI प्रुडेन्शियल लार्ज फंड, ICICI प्रुडेन्शियल मिडकॅप फंड ,आदित्य बिर्ला सन लाइफ फ्लेक्सी कॅप फंड, मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड, ॲक्सिस स्मॉल कॅप फंड, एचडीएफसी लार्ज कॅप फंड ,एचडीएफसी मिड कॅप फंड इत्यादी बेस्ट म्युच्युअल फंड आहेत.

म्युच्युअल फंडात तोटा कधी होतो?

शेअर बाजारात घसरण होत असताना म्युच्युअल फंडात तोटा होतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनी शेअर बाजारावर लक्ष ठेवले पाहिजे.

म्युच्युअल फंडात नकारात्मक गोष्ट काय आहेत?

म्युच्युअल फंडाची पहिली नकारात्मक गोष्ट म्हणजे गुंतवणुकीवर परताव्याची हमी नसते.

भारतातील नंबर 1 म्युच्युअल फंड कंपनी कोणती आहे?

एचडीएफसी म्युच्युअल फंड

मी म्युच्युअल फंडातून पैसे कधी काढू शकतो?

जर तुमचा म्युच्युअल फंड चांगली कामगिरी करत नसेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की दुसरा म्युच्युअल फंडा तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल, तर तुम्ही पैसे काढून ते इतरत्र गुंतवू शकता.

Leave a Comment