Dr.Babasaheb Ambedkar Quotes, Ambedkar Jayanti Wishes , Whatsapp Status in marathi👍

डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर सुविचार(Quotes),भिमजयंती शुुभेेच्छा,व्हाट्सअप्प,फेसबुक स्टेटस मराठीमध्ये👍

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार

 बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि त्यांचे महान सुविचार खरोखर प्रेरणादायक आहेत, जर आपण या महान माणसाच्या विचारांना आपण जर आपल्या आयुष्यात अंमलात आणले तर  आपण आपल्या आयुष्यात खूप उंचीवर पोहचू शकता.प्रेरणादायक सुविचार वाचन केल्यास एखादी व्यक्ती प्रत्येक समस्येचा सामना सहजपणे करू शकते.
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या भीमराव आंबेडकर यांनी समाजातील उच्च-नीच बंद केले त्यांचे मोलाचे योगदान दिले. त्यांचे जीवन अतिशय संघर्षपूर्ण होते आणि त्यांनी भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात अविस्मरणीय योगदान दिले, म्हणूनच त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" देखील म्हटले जाते.

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडक्यात माहिती/Dr.Babasaheb Ambedkar information in marathi. (१८९१-१९५६)

सामाजिक समानतेसाठी संघर्ष करणारे, समाजसुधारक आणि भारतीय राज्यघटनेचे मुख्य निर्माता डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदोर जवळ महू छावणी येथे झाला. त्याचे बालपण नाव भीमा सकपाळ होते. हायस्कूल उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बडोद्याच्या महाराजाच्या मदतीने उच्च शिक्षण घेतले आणि  शिष्यवृत्तीवर कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला आणि कोलंबिया विद्यापीठातूनच पीएच.डी. ची पदवी  घेतली,अभ्यास करण्यासाठी परदेशात गेलेले हे भारताचे पहिले अस्पृश्य होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी महत्त्वाची कार्ये-घटना👍

डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये "मुकनायक" (साप्ताहिक) आणि १९२७ मध्ये बहिष्कृत भारत (मासिक) प्रकाशित केले.

ऑगस्ट १९३६ मध्ये दलित वर्ग, कामगार आणि शेतकर्‍यांच्या समस्यांशी संबंधित  “इंडिपेंडेंट लेबर पार्टी” स्थापना केली.

१९४२ मध्ये या संस्थेचे नामांतर अखिल भारतीय अनुसूचित जाती संघटना असे करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीशांनी आयोजित केलेल्या तीन गोलमेज परिषदेत अनुसूचित जातींचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पहिले कायदा मंत्री म्हणून नियुक्त केले गेले. ५ फेब्रुवारी १९५१ रोजी आंबेडकरांनी संसदेत "हिंदू कोड बिल" आणले आणि ते अयशस्वी झाले. त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.

१९५५ मध्ये त्यांनी भारतीय बौद्ध धर्म परिषदेची स्थापना केली आणि नागपुरात  ५ लाख लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला. "माझा जन्म हिंदू धर्मात झाला पण मी बौद्ध धर्मात मरणार" असे त्यांचे प्रसिद्ध विधान होते.

१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख रचना
  • शूद्र कोण आहेत?/Who are the Shudra?
  • जातीचा विनाश/Annihilation of caste
  • पाकिस्तान किंवा भारत विभाजन/Pakistan or Partition to India
  • राज्य आणि अल्पसंख्याक/State andminorities
  • असे आंबेडकर बोलले /Thus spoke Ambedkar

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार तुम्हाला नक्की देतील प्रेरणा(Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi)


१४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते, म्हणून आज आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल उत्कृष्ट आणि प्रेरणादायक सुविचार  देत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार, Dr. Babasaheb Ambedkar Quotes ,डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा ,जे तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या स्टेटस वर वापरू शकता. आपण आपल्या मित्र/मैत्रिणी बरोबर देखील  share करू शकता आणि आपल्या मनात या सुविचारांची खोली घेऊ शकता आणि यशस्वी जीवन जगू शकता.


Dr.Babasaheb Ambedkar Quotes in marath
Dr.Babasaheb Ambedkar Quotes in marathi


शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!


बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.


एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.स्वता:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.


तिरस्कार माणसाचा नाश करतो.


लोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत.


माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.


  Dr.Bbasaheb ambedkar suvichar marathi
Dr.Bbasaheb ambedkar suvichar marathi


लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा
लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि
सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात 
न घेता लेखणी हातात घेऊन 
अन्यायावर मात करा.


अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.


तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.


यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक  आहे.


स्त्रियांनी जी प्रगती केली आहे तिच्या पदवीनुसार मी त्यानुसार समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे 
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला 
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर 
पराभव निश्चित आहे.सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.


सा-या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.


एखादा खरा प्रियकर
ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो
त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.


आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.


ग्रंथ हेच गुरू.


मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.


शंका काढण्यास देखील ज्ञान लागतं.


कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.


करूणेशिवाय विद्या
बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.


 ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.


प्रयत्न यशस्वी होवोत 
अथवा अयशस्वी होवोत
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तेव्य केलेच पाहिजे,
जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूंचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो 
तेव्हा त्याचे शत्रू देखील 
त्याचा सन्मान करू लागतात.


शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.
अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद
आपल्यात येण्यासाठी आपण
स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.


आयुष्य मोठे होण्याऐवजी महान असले पाहिजे.


देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.


पुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत. एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते. अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.


चारित्र्य शोभते संयमाने,
सौंदर्य शोभते शीलाने.


जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.


माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.


पती-पत्नीमधील नातलगाचे नाते जवळच्या मित्रांसारखे असले पाहिजे.


लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.


नशिबामध्ये नाही तर
आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.


लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.
शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.


बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.


जर आपल्याला अखंड आधुनिक भारत हवा असेल तर सर्व धर्मांच्या शास्त्राचे सार्वभौमत्व संपले पाहिजे.


 मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.


आपल्याला कमीपणा येईल
असा पोषाख करू नका.


प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.


पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.


मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.


भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत
पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.
कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.
एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.


हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.


आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.


आम्हाला हे स्वातंत्र्य का आहे? आम्हाला हे स्वातंत्र्य आहे जेणेकरून आम्ही आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकू जे आपल्या असमानतेने, भेदभावाने आणि आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या इतर गोष्टींनी परिपूर्ण आहे.


शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.


तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.


उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.


एकत्वाची भावना
ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.


शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा/Dr.Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi .💐💐💐डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2020:

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती  14 एप्रिल 2020 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्यासमोर  काही प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश(sms), एसएमएस, कोट्से  इ. जे आपण आपल्या मित्रांसह आणि मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेयर करू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती  14 एप्रिल 2020  रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात, साजरी केली जाईल. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे कलेक्शन आवडेल👍सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती 
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#जय भीमराजा येतोय संविधानाचा 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.💐💐💐,
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला...
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला 
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला...👌
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला 
तू भीमाचा वाघ आहे.....
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐


माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे 
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे


हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता...
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा 
इरादा नेक होता....!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता....!


मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.👌


दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून
गेले.


होय ,
ज्यांच्या 'Problem of Rupee' या
ग्रंथातून 'भारतीय रिजर्व बँकेची' स्थापना 
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
#भीमजयंती


ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.


होय ,
जगातला असा एकमेव विद्यार्थी 
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस 
'विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा करतात,
अशा महान "विद्यार्थीची" जयंती
आहे.
#भीमजयंती


दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त 
जय भीमवालाच होईल.👍


डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.


'मनुस्मृती'
दहन करून 
"भारतीय महिलांना"
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास 
कोटी-कोटी प्रणाम.🙏🙏🙏


अधिक वाचा/ Read more👍👇


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Babasaheb Ambedkar suvichar , Status, Quotes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की Dr. Babasaheb ambedkar status in marathi , motivational Quotes, Dr.Babasaheb ambedkar Suvichar तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍


नोट : Dr.Babasaheb ambedkar Status-suvichar-shubhecha in marathi  या लेखात दिलेल्या डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर सुविचार(Quotes),आंबेडकर जयंती शुभेच्छा, स्टेटस मराठीमध्ये👍 .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Post a Comment

0 Comments