ॲमेझॉन वरून पैसे कसे कमवायचे? | How To Earn Money From Amazon In Marathi 2024.

ॲमेझॉन मधून पैसे कसे कमवायचे? / Amazon Varun Paise kase Kamvayche?

How To Earn Money From Amazon In Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासोबत असे पाच प्रॅक्टिकल आणि प्रूवन मार्ग शेर करणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही Amazon सोबत सहभागी होऊन अर्धवेळ आणि पूर्ण वेळ दोन्ही पध्दतीने अतिरिक्त कमाई करू शकतो.

ॲमेझॉन वरून पैसे कसे कमवायचे? / How To Earn Money From Amazon In Marathi 2023.

आजची पोस्ट सर्व कॅटेगरीतील लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे, ज्यांना ऑनलाइन कमाई करायची आहे. आता ती गृहिणी असो, विद्यार्थी असो, नोकरवर्ग असो किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणारा व्यक्ती असो. त्यामुळे पोस्ट सुरुवात पासून शेवट पर्यंत नीट वाचा.

1) ॲमेझॉन एफिलिएट / ॲमेझॉन असोसिएट प्रोग्राम

ॲमेझॉन असोसिएट प्रोग्राम म्हणजे काय? किंवा त्याला Amazon Affiliate का म्हंटले जाते हा प्रश्न तुमच्या मनात पडला असणार आहे. जे लोक ॲमेझॉन एफिलिएट प्रोग्राम जॉईन करतात व त्यानंतर प्रॉडक्ट प्रमोट करतात आणि ते प्रॉडक्ट विकले गेल्यावर, त्या बदल्यात त्या लोकांना अमेझॉनकडून काही कमिशन मिळते.

ॲमेझॉन एफिलिएट करून पैसे कसे कमवायचे?

 1. ॲमेझॉन एफिलिएटमधुन पैसे कमवायचे असतील तर सर्वप्रथम तुम्हाला Amazon Affiliate च्या लिंकवर जाऊन आपली स्वत:ची एफिलिएट म्हणून नोंदणी करावी लागेल.
 2. ॲमेझॉनवर एफिलिएट म्हणून नोंदणी केल्यानंतर, आपल्याला एक डॅशबोर्ड मिळेल. त्या डॅशबोर्डच्या साहाय्याने आपण काय करू शकतो की आपल्याला जे काही प्रॉडक्ट प्रमोट करायचे आहे, आपण त्या प्रॉडक्टची लिंक तयार करू शकतो.
 3. जेव्हा आपण ॲमेझॉन एफिलिएटची लिंक पुढे आपल्या सोशल मीडियावर, व्हाट्सअपवर शेअर करतो किंवा कुठेही प्रचार करतो.
 4. आपण शेअर केलेल्या लिंकद्वारे जी काही खरेदी केली जाईल, त्या विशिष्ट प्रॉडक्टच्या कॅटेगिरीनुसार आपल्याला कमिशन मिळते.

ॲमेझॉन एफिलिएट कश्या प्रकारे केले पाहिजे?

 • पहा, आम्ही तुम्हाला उदाहरणासह सांगतो, जसे की समजा तुमचे एक YouTube चॅनेल आहे आणि तेथे तुम्ही प्रॉडक्टचे अनबॉक्स करत आहे आणि अनबॉक्सिंगसह तुम्ही प्रॉडक्टचे रिव्यु / review करत आहे.
 • तुम्ही प्रॉडक्ट कसे आहे ते सांगत आहे? त्याचे वैशिष्ट्य काय आहे?  प्रॉडक्ट कश्या प्रकारे उपयोगी पडू शकते? त्यानंतर तुम्ही असे करू शकता की विडिओच्या डिस्क्रिप्षनमध्ये ॲमेझॉन एफिलिएट लिंक तुमच्या subscriber सोबत शेअर करू शकता.
 • त्यामुळे जर कोणी YouTube वर त्या प्रॉडक्टचा review पाहिला आणि त्याला प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल तर ते तुमच्या Amazon Affiliate च्या लिंकवर क्लिक करतील आणि तेथून प्रॉडक्ट खरेदी करतील.
 • जेव्हा कोणी तुमच्या Amazon Affiliate लिंकद्वारे प्रॉडक्ट खरेदी करेल, तेव्हा ते तुमच्या एका विक्रीत गणले जाईल आणि तुम्हाला त्यासाठी कमिशन मिळेल.

ॲमेझॉन एफिलिएटसाठी सोशल मीडियाचा करा वापर !

बरेच लोक त्यांच्या ब्लॉगवर प्रॉडक्टचे review करतात, काही ज्यांचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत, ते सोशल मीडियाद्वारे एफिलिएट करतात. काही लोक फक्त व्हाट्सअपवर त्यांच्या ग्रुपमध्ये एफिलिएट लिंक प्रमोट करतात.

Amazon Affiliate मध्ये जॉईन होऊन आपण Amazon वरून चांगले पैसे कमवू शकतो. ही एक प्रसिध्द पद्धत आहे आणि प्रॅक्टिकल देखील आहे आणि बरेच लोक अर्धवेळ आणि पूर्ण वेळ हे काम करून पैसे कमावत आहेत.

2) प्रॉडक्ट विक्री / Product Sales

Amazon वरून पैसे कमवण्यासाठी पहिला मार्ग जो सर्वात लोकप्रिय आहे आणि बरेच लोक ते वापरत आहेत आणि Amazon वरून कमाई करतात तो म्हणजे Amazon वर कोणतेही उत्पादन / प्रॉडक्ट विकणे आहे.

पहा Amazon हे जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठे पैकी एक आहे आणि Amazon वर भरपूर visitor म्हणजे लाखो- करोडो लोक जे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी दररोज अमेझॉनच्या वेबसाईटवर भेट देत असतात.

अमेझॉन वर विक्री करून पैसे कसे कमवावे?

जर तुम्हाला अमेझॉनवर प्रॉडक्ट सेल करायचे असेल तुमचे प्रॉडक्ट युनिक असले पाहिजे किंवा तुम्ही असे कोणतेही प्रॉडक्ट सोर्स करू शकता ज्याला बाजारात मागणी आहे, मग तुम्ही ते प्रॉडक्ट Amazon वर लिस्ट करून विकू शकतात आणि पैसे कमावू शकतात.

 1. तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत ते म्हणजे तुम्हाला एक चांगला घाऊक विक्रेता किंवा मॅन्युफॅक्चरर शोधायचा आहे, जिथून तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करू शकतो.
 2. त्यानंतर तुम्हाला Amazon वर सेलर म्हणून नोंदणी करावी लागेल, ज्यासाठी तुम्हाला GST ची आवश्यकता आहे.
  आणि त्यानंतर, Amazon वर तुम्हाला प्रॉडक्ट लिस्ट करून घ्याचे आहे.
 3. काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा वापर करून, जसे की तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करणे, जर तुम्हाला त्या प्रॉडक्टची जाहिरात करायची असेल, तर ती चालवणे किंवा कंटेंट चांगले बनवणे या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. ज्यामुळे आपले प्रॉडक्ट Amazon च्या शोध परिणामात दिसण्यात मदत मिळते.
 4. वरील स्ट्रॅटेजीचा अवलंब करून, तुम्ही तुमचे प्रॉडक्ट Amazon वर विजिबिलिटीमध्ये आणू शकता.
 5. जेव्हा ॲमेझॉनवर ग्राहक प्रॉडक्टचा शोध घेत असतात, तेव्हा आपण लिस्टिंग केलेल्या त्या प्रॉडक्टला रँक मिळू शकते आणि तुम्ही त्या प्रॉडक्टची विक्री करू शकतो.
 6. Amazon वर प्रॉडक्ट विकून, तुम्ही भरपूर कमाई करू शकता आणि तुमचा व्यवसाय ऑनलाईन इस्टॅब्लिश करू शकता.

Items Fulfilled By Amazon

Amazon व्यवसायिकांना Amazon द्वारे Fulfilled By Amazon चा ऑपशन देखील देतात, जेथे व्यावसायिक त्यांची प्रॉडक्ट Amazon च्या वेअरहाऊसमध्ये ठेवू शकतात. ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये प्रॉडक्ट साठवल्यानंतर, त्या प्रॉडक्टचे पॅकिंग आणि ते ग्राहकांना पाठवण्याचे सर्व काम ॲमेझॉन टीमद्वारे व्यवस्थापित केले जाते. आपल्याला फक्त किंमत ठरवायची आहे आणि प्रॉडक्टची सूची आपल्याला मॅनेज करावी लागेल.

त्यामुळे जर तुम्हाला Amazon सोबत व्यवसाय करायचा असेल, तर Amazon वर विक्रेता म्हणून ऑनबोर्ड होण्याचा आणि तुमची प्रॉडक्ट विकण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

3) ॲमेझॉन फ्लेक्स

आता मुळात Amazon Flex मध्ये आपल्याला Amazon ची प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवायची आहेत म्हणजेच ग्राहकांना डिलिव्हर करायची आहे. त्याबदल्यात आपल्याला ॲमेझॉनकडून मोबदला मिळतो. येथे ॲमेझॉन फ्लेक्सचे काही फायदे असे आहेत की फ्लेक्समध्ये, सर्वप्रथम, आपल्याला कोणत्या वेळेच्या स्लॉटमध्ये काम करायचे आहे ते आपण वेळ निवडू शकतो.

समजा तुम्ही सायंकाळी फ्री असता तर उदाहरणार्थ, समजा दुपारी 4-8 च्या दरम्यान तुम्ही फ्री असता तर, तुम्ही डिलिव्हरी करण्यासाठी 4-8 च्या दरम्यान स्लॉट निवडू शकता. त्यामुळे या विशिष्ट वेळेत येणाऱ्या प्रॉडक्टच्या डिलिव्हरी तुम्हाला कराव्या लागतील. असे बरेच लोक आहेत जे फ्लेक्सशी जॉईन आहेत आणि जे हे काम करून पार्ट टाइम पैसे कमावत आहेत.

ॲमेझॉन फ्लेक्सवर पैसे कसे कमवायचे?

 1. Amazon Flex वर काम करण्यासाठी किंवा डिलिव्हरी मिळवण्यासाठी तीन सोप्या स्टेप्स आहेत.
 2. सर्व प्रथम आपल्याला एक ब्लॉक रिजर्व करावा लागेल म्हणजे आपण ज्या कालावधीत प्रॉडक्ट डिलीवरी करणार आहोत तो कालावधी राखून ठेवावा लागेल.
 3. त्यानंतर त्या विशिष्ट कालावधीत आपल्याला जी काही डिलिव्हरी मिळेल ती करायची आहे आणि त्यानंतर फ्लेक्सकडून आपले payment होईल.

ॲमेझॉन फ्लेक्सवर आवश्यकता

 • सर्व प्रथम काही विशिष्ट शहरांमध्ये ॲमेझॉन फ्लेक्स कार्यरत आहे. त्यामुळे आपण त्या विशिष्ट शहरात राहणारे व्यक्ती असले पाहिजे.
 • त्यानंतर आपले वय कमीत कमी 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
 • त्यानंतर आपल्याकडे वैध चालक परवाना असणे आवश्यक आहे.
 • तुमच्याकडे दुचाकी आणि एक Android स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
 • त्यानंतर आपली पार्श्वभूमी तपासली जाते,त्यानंतर आपण ॲमेझॉन फ्लेक्सवर काम करू शकतो.  

जर आपण ॲमेझॉन फ्लेक्स कोणत्या शहरांत उपलब्ध आहे याची लिस्ट पाहायची असेल तर, तर आपण Amazon च्या वेबसाइटला भेट देऊन शहरांची लिस्ट पाहू शकतो.

4) ॲमेझॉन सर्विस प्रोव्हायडर नेटवर्क

ॲमेझॉनवर उत्पादनांच्या विक्रीनंतर, ॲमेझॉन सर्विस प्रोव्हायडर नेटवर्क आणखी एक पैसे कमवायचा मार्ग येतो, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे, परंतु Amazon मध्ये जॉईन होऊन आपण कमाई करू शकतो असा हा एक उत्तम मार्ग आहे. ज्याला Amazon SPN सेवा देखील म्हणतात. बघा, Amazon वर जे विक्रेते आहेत त्यांच्या वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळ्या आवश्यकता आहेत. विक्रेते स्वतःहून सगळ्या गोष्टी करू शकत नाही.

ॲमेझॉनवरील विक्रेत्यांना ज्या वेगवेगळ्या सर्विसेसची आवश्यकता असते जसे की प्रॉडक्टचे कॅट लॉगिंग, प्रॉडक्टचे फोटोग्राफी, अकाउंटिंग, कंटेंट बनवणे, प्रॉडक्टची लिस्टिंग करणे, इत्यादी खूप सारे कामे स्वतः विक्रेते करू शकत नाही आणि ॲमेझॉन वरील विक्रेते हे काम एखाद्या थर्ड पार्टी कंपनीला किंवा व्यक्तीला करायला द्यावे अशी त्यांची इच्छा असते. तर अशा ठिकाणी भूमिका येते ती Amazon Service Provider Network, Amazon SPN ची!

तर समजा आपल्याकडे कौशल्य आहे किंवा आपल्याकडे एक्स्पर्ट लोक आहे, जे Amazon विक्रेत्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात , तर आपण Amazon विक्रेत्यांना हव्या असलेल्या सेवा देऊ शकता. आपल्याकडे स्किल आहे तर आपण Amazon SPN नेटवर्कशी कनेक्ट करू शकता. आपण येथे Amazon च्या Seller Central Panel मध्ये देखील पाहिले, तर येथे इमेजिंग, कॅटलॉगिंग, अकाउंट मॅनेजमेंट, जाहिरात, ऑप्टिमायझेशन, अकाउंटिंग, डोमेस्टिक शिपिंग इ. अशा अनेक सेवा आहेत ज्यांना आपण Amazon SPN नेटवर्कमध्ये जॉईन होऊन विक्रेत्यांना आपण देऊ शकतो.

Amazon SPN मधून पैसे कसे कमवायचे?

 1. जर तुम्ही प्रॉडक्टची चांगल्या प्रकारे कॅटलॉगिंग करू शकता किंवा चांगले कंटेंट बनवून देऊ शकता, प्रॉडक्ट सूची बनवू शकता किंवा इतर कामे करू शकता तर तुम्ही amazon spn ला जॉईन करू शकता.
 2. amazon spn जॉईन केल्यानंतर विक्रेते प्रॉडक्ट लिस्टिंगसाठी किंवा कंटेंट तयार करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधतील.
 3. विक्रेत्यांनी दिलेले काम तुम्ही व्यवस्थित करून त्यांच्याकडून कामाचे शुल्क आकारू शकतात आणि अश्या प्रकारे तुम्ही Amazon Spn द्वारे कमाई करू शकता.
 4. आपल्याला Amazon SPN मध्ये सामील होण्यासाठी  contact@amazon.com वर मेल करावा लागेल. तिथे आम्ही मेल केल्यावर तुम्हाला विक्रेत्याला कोणती सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे ते कळणार आहे.
 5. Amazon तुमच्याबद्दल काही तपशील मेलद्वारे तुमच्याकडून घेतील आणि त्यानंतर तुम्ही Amazon च्या SPN म्हणजे सर्विस प्रोवाइडर नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकता आणि येथूनही कमाई करू शकता.

5) ॲमेझॉन सेलर रेफरल प्रोग्राम

Amazon Seller Referral Program मुळात असे आहे की ज्यामध्ये आपण Amazon वर विक्रेत्याला ऑनबोर्ड करतो. तेव्हा कोणत्याही विक्रेत्याला रेफर करतो की भाऊ तुम्ही Amazon वर या आणि तुमची उत्पादने विक्री करा. जेव्हा कोणी विक्रेता आपल्या रेफरने ॲमेझॉन सेलरला जॉईन होतो, तर त्या बदल्यात आपल्याला ॲमेझॉनकडून पेआउट मिळतो. हे बेसिकली एखाद्या एफिलिएट प्रोग्राम सारखे आहे.

आपल्याला ॲमेझॉनकडून एक लिंक मिळते, जेव्हा आपण ती लिंक पुढे सेलरसोबत share करतो आणि त्या लिंकद्वारे कोणताही विक्रेता Amazon वर नोंदणी करतो, तेव्हा आपल्याला मोबदल्यात पैसे मिळतात आणि त्यानंतर जेव्हा तो विक्रेत्याच्या प्रॉडक्टची विक्री होते, तेव्हा त्या सेलचा काही भागही आपल्याला मिळतो.

ॲमेझॉन सेलर रेफरल प्रोग्राम मधून पैसे कसे कमवायचे?

 1. जर आपण Amazon च्या सेलर रेफरल प्रोग्रामबद्दल बोललो तर आपल्याला सेलर सेंट्रल अकाउंटमध्ये सेलर रेफरल प्रोग्रामचा पर्याय मिळेल.
 2. आपल्याला सिंपली ग्रोथ पर्यायावर जावे लागेल आणि येथे जेव्हा आपण “सेलर रिवॉर्ड” ऑप्शनवर क्लिक करा किंवा आपल्याला येथे रेफर फ्रेंड असा ऑप्शन मिळतो.
 3. आपण सध्याच्या प्लॅननुसार तपासल्यास, आपल्याला विक्रेत्याला रेफर करण्यासाठी ₹ 2000 मिळतील. एवढेच नाही तर आपण ₹80,000 पर्यंत अतिरिक्त कमाई करू शकतो, आपण रेफर केलेला विक्रेता किती विक्री करतो यावर ते अवलंबून असणार आहे.
 4. जर आपण येथे पे ऑफरच्या तपशीलावर गेलो आणि येथे कोणता विक्रेता लाँच मानला जाईल हे पाहिले तर,जसे की आपण लिंक शेअर करतो आणि जेव्हा सेलर नोंदणी करतात.
 5. जे सेलर अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर त्यांची लिस्टिंग live करतात ते लाँच मानले जाईल.

जर तुमच्याकडे असे नेटवर्क असल्यास आपण अधिक विक्रेते अमेझॉनवर आणू शकतो आणि त्यांना Amazon वर सेलर म्हणून रजिस्टर करू शकतो. तर तुमच्यासाठी ॲमेझॉन सेलर रेफरल प्रोग्राम पैसे कमवून देण्यासाठी सर्वोत्तम मार्ग असणार आहे.

Final Word :-

Amazon वरून कमाईचे असे एकूण पाच मार्ग आहेत.
असे पाच व्यावहारिक मार्ग आहेत ज्याद्वारे आपण Amazon वर कमाई करू शकतो.
 
सर्व प्रथम, Amazon वर कोणतीही प्रॉडक्ट विकून, दुसरे म्हणजे Amazon चे सर्विस प्रोवाइडर नेटवर्क म्हणजेच, Amazon SPN मध्ये सामील होऊन, तिसरे Amazon Affiliate Program मध्ये सामील होऊन, त्यानंतर Amazon Flex Delivery Partner बनून आणि शेवटचा Amazon सेलर रेफर करून आपण Amazon वरून कमवू शकतो.

Leave a Comment