सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय माहिती | Cement Blocks and Tiles Manufacturing Business Information Marathi.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय माहिती / Cement Blocks and Tiles Manufacturing Business Information Marathi.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय माहिती

आजच्या पोस्टमध्ये आपण सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाविषयी (Cement Blocks and Tiles Manufacturing Business Information Marathi) माहिती देणार आहोत. सिमेंट ब्लॉक्स अँड टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय कशा पद्धतीने प्रोफिटेबल करता येईल याविषयी आजच्या पोस्टमध्ये तुम्हाला माहिती पाहायला मिळेल.त्याचबरोबर लागणारे भांडवल,मशिनरी, रॉ मटेरियल, लागणारी जागा, मॅन पावर, लागणारे लायसन्स, प्रॉफिट, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, आणि व्यवसायासाठी कोणते रिसर्च करायचे आहेत.यासगळ्या गोष्टीवर आजच्या पोस्टमध्ये सविस्तर माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.

कशाप्रकारे तुम्ही कस्टमरला आकर्षित करू शकतात व कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. या साऱ्या गोष्टींची माहिती पोस्टमध्ये दिली आहेत तर पोस्ट सुरूवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायामध्ये काय रिसर्च करावे लागेल?

तुम्हाला डिमांड,सप्लाय,किंमत,क्वांटिटी,क्वालिटी या सगळ्या गोष्टींचा सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय करण्यापूर्वी रिसर्च करणे गरजेचे आहे.जे पण व्यापारी सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्सची मॅन्युफॅक्चरिंग करत आहेत त्यांच्याकडून तुम्हाला माहिती घेणे गरजेचे आहे.
ते कश्या प्रकारे कच्चा माल विकत घेतात?
त्यांनी कोणत्या प्रकारच्या मशीनरीचा सेटअप केला आहे? किती प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे त्यांच्या प्लांटची? किती उपयोग गुंतवणूक करून त्यांनी हा व्यवसायाची सुरुवात केली? ज्या लोकल मार्केटमध्ये ते सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स सेल करत आहे तिथे किती डिमांड आहे.

या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर तुम्हाला कळेल की तुम्हाला किती भांडवल लागणार आहे.त्यानुसार तुम्ही ठरवू शकतात की तुम्हाला छोट्या प्रमाणावर का मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करायचा आहे.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायामध्ये कच्चा माल काय लागेल?

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायामध्ये सामान्यतः कच्चा माल सिमेंट,वाळु,स्टोन चिप्स ( खडी ) असणार आहे.उर्वरित कच्चा माल तुमच्या प्रोडक्टच्या उत्पादनावर व गुणवत्तावर अवलंबून असणार आहेत,की तुम्ही कोण-कोणते वेगवेगळा कच्चा माल मॅन्युफॅक्चरिंगसाठी वापरता. परंतु बेसिक महत्वाचे कच्चा माल सिमेंट,वाळू,आणि खडी आहेत.

हा सगळा कच्चा माल तुम्ही होलसेल मार्केट किंवा वेगवेगळे उत्पादन आहेत या मालाचे त्यांच्याकडून विकत घेऊ शकता. तुमच्या डिपेंड असणार आहे व तुम्हाला जिथे स्वस्तात यागोष्टी उपलब्ध होतील तिथून तुम्ही घेऊ शकता.मालाच्या किंमतीच्या बरोबर तुम्ही मालाची कॉलिटीचे ध्यान द्यायला विसरू नका.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायामध्ये
कोणत्या मशिनरी लागतात?

  1. काँक्रीट मिक्सर आणि ॲक्सेसरीज
  2. हायड्रोकली ऑपरेटेड ब्लॉक मेकिंग मशीन
  3. मेकॅनिकल टाईल्स मेकिंग प्रेस
  4. मोल्ड्स अँड टूल्स
  5. पंप सेट्स
  6. कुरिंग अँड टॅंक
    वरील सर्व मशनरीच्या मदतीने तुम्ही सिमेंट बॉक्स आणि टाईल्सची मॅन्युफॅक्चरिंग करू शकतात.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करायला किती इन्व्हेस्टमेंट लागेल?

भांडवलाचा विचार केला तर तुम्हाला दहा ते पंचवीस लाख रुपये कमीत कमी भांडवल हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागेल.यामध्ये किती भांडवल लागेल हे तुम्ही कोणत्या मशिनरी विकत घेता,किती कच्चा माल स्टोर करता,किती प्रोडक्शन कॅपिसिटीच्या मशिनरी आहेत, किती माणसे कामाला आहेत,इत्यादी गोष्टींवर तुम्हाला किती भांडवल लागेल हे अवलंबून आहे.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय ग्राहक कोण असणार?

होलसेलर ,रिटेलर,कन्ट्रक्शन,बांधकाम व इतर विभाग हे तुमचे या व्यवसायातील मुख्य ग्राहक असतील.तुम्ही शाळा,कॉलेज,वेगवेगळ्या बिल्डिंग बनत असतात त्याठिकाणी तुम्ही सेल करू शकतात किंवा मोठ्या कॉट्रॅक्टर बरोबर करार देखील करू शकता.

तुम्ही होल सेल मार्केटमध्ये पण चांगल्या किंमतीत प्रोडक्ट सेल करू शकता आणि चांगले प्रॉफिट कमवू शकता.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय यशस्वी करण्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय करावी?

पब्लिसिटी,जाहिरात,सेल्स प्रमोशन,व डायरेक्ट मार्केटिंग यासगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या व्यवसायाचा मॉडेल आणि प्लॅन पाहून वापरू शकतात.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायासाठी जागा व मॅन पॉवर किती लागेल?

तुम्हाला किती जागा लागेल व किती माणसे कामाला ठेवायला लागतील हे तुमच्या भांडवल आणि व्यवसायाच्या मॉडेलवर अवलंबून आहे. किती मशनरीच्या सेटअप तुम्ही केलाय? प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे? किती रॉ मटेरियल तुम्ही स्टोअर करत आहात? या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला किती जागा लागेल व मॅनपावर लागेल हे अवलंबून आहे.

तुम्हाला कमीत कमी 800 ते 1000 स्क्वेअर फुट जागेत तुम्ही हा व्यवसाय सेटअप करू शकतात. मॅनपावर तुम्हाला 15 ते 30 कामगार सुरुवातीला कामाला ठेवायला लागतील. मॅनपावर मध्ये स्किल वर्कर व कामगार या सर्वांचा समावेश आहे.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायासाठी कोणती लायसन्स लागतील?

  • ट्रेंड लायसन्स
  • जीएसटी नंबर
  • टेडमार्क
  • अनुदानासाठी SSI नोंदणी
  • बीआयएस प्रमाणपत्र
  • एम.एस.एम.इ उद्योग आधार
  • एन.ओ.सी फ्रॉम स्टेट पोलुशन कंट्रोल बोर्ड
    या सगळ्या लायसन्सच्या अप्रुवल मिळाल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात.

सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायामध्ये प्रॉफिट कसे असेल?

कोणते व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आपले मुख्य उद्देश्य त्या व्यवसायातुन आपल्याला किती प्रॉफिट होईल यावर केंद्रित असते.तुमचे या व्यवसायातील प्रॉफिट हे तुमच्या प्रोडक्शन आणि बिझनेस मॉडेलवर डिपेंड असणार आहे.तुमचे या व्यवसायातील प्रॉफिट हे तुम्हाला लेबर कॉस्ट किती पडतोय ? तुमचे किती सेल होत आहे ? कोणत्या प्रकारची मशिनरी तुम्ही लावलेली आहे ? या सगळ्या गोष्टींवर तुमचे प्रॉफिट डिपेंड असणार आहे. जर एवरेज इन्कम दिलेल्या कमीत कमी भांडवलनुसार तुम्हाला 7 ते 8 लाख रुपये वार्षिक प्रॉफिट होऊ शकते.

Final Word :-

आजच्या पोस्टमध्ये सिमेंट ब्लॉक्स आणि टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाबदल सर्व माहिती / Cement Blocks and Tiles Manufacturing Business Information Marathi दिलेली आहे.कश्या प्रकारे या व्यवसायाबद्दल रिसर्च केले पाहिजे? रिसर्च केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे ध्यान ठेवले पाहिजे? कोणत्या कच्च्या मालाची गरज पडेल? कोणत्या मशनरीची आवश्यकता पडेल? कोणत्या लायसन्सची गरज पडेल? तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी किती इन्वेस्टमेंट लागेल व त्यासाठी किती जागा लागेल? किती मॅन पावर लागेल? या सर्व गोष्टी विषयी आजच्या पोस्टमध्ये आम्ही विस्तृत स्वरूपात माहिती दिलेली आहे

Leave a Comment