छोटे व्यवसाय आयडिया मराठीत | New Small Business Ideas In Marathi.

कमी भांडवल व्यवसाय आयडिया मराठी / Low Investment Business Ideas Marathi.

Small Business Ideas In Marathi

मित्रांनो बऱ्याच लोकांना व्यवसाय करायचा असतो परंतु एकतर त्यांच्याकडे भांडवल नसते किंवा त्यांचाकडे कल्पना नसते की कोणता उद्योग केला पाहिजे.जर तुमच्याकडे भांडवल पण कमी आहे आणि व्यवसाय काय करावा याची आयडिया पण नाहीये तर आजच्या पोस्टमध्ये आम्ही काही व्यवसाय आयडिया घेऊन आलो आहोत.

जे तुम्ही अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकतात.या व्यवसाय आयडिया फार युनिक आहे आणि या उद्योगधंद्यांची डिमांड संपूर्ण वर्षभर असते. या व्यवसायातून तुम्ही वीस ते पन्नास हजार रुपये महिन्याला आरामात कमवू शकता. आजच्या पोस्टमध्ये अगदी कमी इन्वेस्टमेंट मध्ये करता येणाऱ्या व्यवसाय आयडिया / Small Business Ideas In Marathi दिलेल्या आहेत तर आजची पोस्ट पूर्ण वाचा.

छोटे बिजनेस आयडिया मराठीत / New Small Business Ideas In Marathi 2023

खाली तुम्हाला काही कमी इन्वेस्टमेंट असलेले व्यवसाय आयडिया देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.तुम्हाला या बिजनेस आयडिया आवडल्या तर तुमच्या मित्र-मैत्रिणी व फॅमिली मेंबर सोबत ही पोस्ट share करायला विसरू नका.👍

चहा कॉफी व्यवसाय / Tea Coffee Business :-

चहा कॉफी विक्री व्यवसाय तुम्ही टपरी किंवा एखादा गाळा घेऊन सुरू करू शकतात. हा व्यवसाय तुम्ही पूर्ण वेळ किंवा पार्ट टाइम सुद्धा करू शकतात.चहा कॉफी विक्री व्यवसायातून तुम्ही दिवसाला एक ते दोन हजार रुपये आरामात कमाई होईल. या व्यवसायात पंधरा ते वीस हजार रुपये इन्वेस्टमेंट करून तुम्ही सुरू करू शकतात.

फळांचा ज्यूस व्यवसाय / Fruit Juice Business :- 

वर्षातल्या वेगवेगळ्या सीजनमध्ये वेगवेगळ्या ज्यूसची डिमांड असते. जसे की उन्हाळ्यात उसाचा रस तसेच आंब्याच्या रसाची डिमांड फार मोठ्या प्रमाणात असते. हा व्यवसाय जास्त प्रॉफिटसाठी तुम्ही शाळा, महाविद्यालय ,हॉस्पिटल इत्यादी ठिकाणांच्या आसपास करू शकतात. या व्यवसायात तुम्हाला ग्राहकांना बसण्यासाठी काही खुर्च्या घ्यावा लागतील व मिक्सर चा खर्च येईल.फळांचा ज्यूस व्यवसाय तुम्ही 30 ते 40 हजार रुपये इन्व्हेस्ट करून सुरू करू शकतात.

गाड्या वॉशिंग व्यवसाय / Car Washing Business  :-

गाड्या धुण्याच्या व्यवसायाची मार्केटमध्ये नेहमी डिमांड राहणार आहे.आजच्या घडीला गाव असो किंवा शहर प्रत्येक माणसाकडे गाडी आहे.जेव्हा पण गाडी चिखलाने किंवा धूळ बसून खराब दिसते तेव्हा तिला धुवावे लागते.गाड्या वॉशिंगचे लोकल दुकानमध्ये टू व्हीलर फोर व्हीलर किंमत असते.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 500 स्क्वेअर फुट जमीन असायला हवी.त्याशिवाय तुम्हाला गाड्या वाशिंगची टूलकिट खरेदी करावी लागेल.

गाड्या धुण्या व्यतिरिक्त तुम्ही गाडी डेंट काढणे,गाडी पोलिश करणे,सीट कव्हर बदलणे,स्टिकर लावणे अश्या अनेक प्रकारच्या सर्विसेस देऊ शकतात.

फास्टफूड व्यवसाय / Fast Food Business :-

फास्टफूडच्या दुकानावर तुम्हाला माहिती असेल पूर्ण वर्षभर गर्दी असते. जर तुमच्याकडे भांडवल कमी असेल तर तुम्ही फास्टफूड विक्री चा व्यवसाय करू शकता.यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्यवसाय करू शकतात.जसे की भजे पाव-वडा पाव, सँडविच,पिझ्झा,पाणीपुरी,चायनीज,मिसळ इत्यादी व्यवसाय कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकतात.

टिफिन / मेस व्यवसाय / Mess Business :-

शाळा,महाविद्यालय,जॉबसाठी घरापासून लांब राहत असलेल्या लोकांना घरच्या जेवणाची आवश्यकता असते.
तुम्हाला किंवा तुमच्या घरातील आई,बहीण,बायको कोणालाही चांगले जेवण बनवता येत असेल तर तुम्ही मेसचा व्यवसाय चालू करू शकता.मेसच्या व्यवसाय मध्ये 40% प्रॉफिट मार्जिन असते.या व्यवसायाला सुरू करण्यासाठी तुम्हाला फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता पडत नाही आणि हा व्यवसाय तुम्ही घरातून चालू करून एक चांगली कमाई करू शकतात.

रिसेलिंग व्यवसाय / Reselling Business :- 

रिसेलिंग व्यवसायामध्ये तुम्ही होळसेलर कडून किंवा एखाद्या विकेत्याकडून वस्तू घेऊन त्या वस्तू तुमच्या ग्राहकाला विकतात.जसे की एका विक्रेत्याकडून मी 500 रुपयाला वस्तू विकत घेतली तर ती वस्तु मी पुढे ग्राहकाला 700 रुपयाला विकली तर त्यामागे मला 200 रुपये कमिशन मिळते.

तुम्ही सुरुवातीला अशा प्रकारे कमिशन घेऊन तुमचे प्रॉफिट काढू शकतात पण एकदा तुमचा व्यवसाय वाढला तर तुम्ही तुमचे व्हाट्सअप्प ,इन्स्टाग्राम,फेसबुक ग्रुप बनवू शकता.त्याच बरोबर तुम्ही तुमची वेबसाईट बनून त्यावर प्रॉडक्ट विकू शकतात.

पार्किंग व्यवसाय / Parking Business :-

मित्रांनो आपल्या देशात आता प्रत्येक घरात एक तर गाडी आहेच परंतु सर्व गाडी चालक एक प्रॉब्लेम नेहमी फेस करतात,त्यांना गाडी पार्क करायला जागा मिळत नाही.जर तुम्ही मार्केटमध्ये किंवा कुठे बाहेर फिरायला गेले तर तुम्हाला नेहमी गाडी कुठे पार्क करायची? हा प्रश्न पडत असेल ! जर त्या ठिकाणी पे पार्किंग असेल तर तुम्हाला पैसे देऊन गाडी पार्क करता येते व गाडी चोरी जायचे किंवा तिला नुकसान होण्याचा धोका नसतो.

या व्यतिरिक्त तुम्ही नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यास तुमची गाडी उचलून नेण्याची शक्यता असते. गाड्या पार्किंग व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जागा असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी पार्किंग सुरू करू शकता.

Leave a Comment