3+ जागतिक महिला दिन भाषण मराठी २०२२ | Women’s day speech in marathi | Jagtik mahila din bhashan marathi.

जागतिक महिला दिवस भाषण सूत्रसंचालन मराठी / world women’s day speech in marathi 2022.

Women's day speech in marathi

जागतिक महिला दिन भाषण मराठी २०२२ : महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांनी समाज आणि देशाच्या कल्याणासाठी खूप योगदान दिले आहे, म्हणून समाजातील महिलांच्या योगदानाची प्रशंसा आणि सन्मान,गौरव करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. येथे आम्ही महिला दिनाचे भाषण आज शालेय विद्यार्थी तसेच इतर मान्यवरांसाठी घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला महिला दिनानिमित्त भाषण देण्याची संधी मिळाली असेल, तर तुम्ही या लेखात दिलेले women’s day speech in marathi , mahila diwas bhashan in marathi ,mahila diwas speech in marathi , women’s day bhashan in marathi , women’s day speech in marathi for students , Women’s Day anchoring script in Marathi, anchoring script for women’s day celebration in marathi etc दिलेले आहे ते भाषणांत वापरू शकता.

प्रत्येक स्त्री ही खास असते मग ती घरात असो किंवा ऑफिसमध्ये. एक काळ असा होता की, महिलांना घरात कोंडून ठेवलं जात होतं, घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. घरगुती काम हेच त्यांचे क्षेत्र होते. पण आजच्या समाजात अनेक सकारत्मक बदल झाले आहेत.

महिला दिनासारख्या उत्सवामुळे महिलांना त्यांच्या शक्तीची जाणीव होऊ लागली आहे. आजच्या महिला आता स्वतंत्र आणि स्वावलंबी झाल्या आहेत. घर आणि समाजाच्या भल्यासाठी स्त्री-पुरुष दोघांचेही समान योगदान आहे, हे आपण स्वीकारले पाहिजे.

या लेखात, आम्ही महिला दिनावरील भाषण शेअर करत आहोत / women’s day speech in marathi, ज्याचा उपयोग शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला करता येईल.

जागतिक महिला दिवस भाषण मराठी / Women’s Day bhashan in Marathi 2022

आदरणीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, माझे नाव आहे….., आज मी महिला दिनाविषयी काही शब्द बोलू इच्छितो. सर्वप्रथम, येथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा.

जगातील विविध क्षेत्रात महिलांच्या योगदानाचा गौरव करून दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. जगभरात साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचे महत्त्व वर्षानुवर्षे वाढत आहे.

आजच्या स्त्रिया स्वावलंबी असून समाजाच्या व देशाच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे आणि ते नेहमीच करत आले आहेत. प्रत्येक स्त्री तितकीच महत्त्वाची आहे, मग ती नोकरी करणारी स्त्री असो किंवा आपल्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेणारी स्त्री.

पण त्यांचे मोठे योगदान मान्य करूनही पुरुषांच्या तुलनेत महिलांना मध्यम दर्जाचे स्थान दिले जाते, हे कटू सत्य आहे.

आजही महिला सक्षमीकरण आवश्यक आहे कारण आजही खेड्यात मुलींना शिक्षण मिळत नाही. लहान वयातच त्यांची लग्ने होतात आणि स्त्री भ्रूण हत्येसारख्या समस्या अजूनही आहेत.

झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील, लता मंगेशकर, मदर तेरेसा, अरुणिमा सिन्हा यांसारख्या अनेक महिलांनी दाखवून दिले आहे की स्त्रिया कमकुवत नसतात पण आजही अनेक महिलांना केवळ स्त्री आहे म्हणून घराबाहेर पडू दिले जात नाही.

आपण सर्वांनी या विशेष दिवसापुरतेच महिलांचा आदर आणि कौतुक मर्यादित ठेवू नये कारण प्रत्येक दिवस हा मानवतेचा उत्सव आहे जिथे महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. स्त्रिया हा मानवतेचा केंद्रबिंदू आहे. भाषणाच्या शेवटी मी इतकेच म्हणेल

“चला माणुसकी जिवंत करूया, स्त्रियांचा आदर करूया.”

एवढे म्हणून मी माझे भाषण संपवतो.🙏 धन्यवाद.🙏

महिला दिन भाषण मराठी / Jagtik mahila din bhashan marathi / mahila diwas speech in marathi.

ज्याला स्त्री आई म्हणून कळली, तो जिजाऊंचा शिवबा झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली, तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला …. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,तो सीतेचा राम झाला.

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय, गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित सर्व तमाम महिला भगिनींनो, सर्वप्रथम, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी तसेच लेकीची भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

दरवर्षी ८ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो हा दिवस ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो.

नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शोभा आहे घराची… स्त्री व पुरुष ही संसार रथाची दोन चाक आहेत. पण भारतीय समाजात, स्त्रीयांना पुरुषांच्या सावलीत उभे रहावे लागते. स्त्री चा गौरव केला जातो हे खरे; पण सत्य मात्र वेगळेच आहे.

स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. २१ व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असतानादेखील स्त्रीवर अन्याय, अत्याचार होती. स्त्री ला अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही. खरं तर समाजात महिलांना समान अधिकार आहेत, हे ही अनेकांना माहिती नाही.

तरीही आज भारतीय स्त्री प्रगती पथाकडे वाटचाल करीत आहे. जसे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, किरण बेदी, लता मंगेशकर, सिंधूताई सपकाळ, पी.टी. उषा, सानिया मिर्झा, मिताली राज अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी विविध क्षेत्रात अनमोल कामगिरी केली आहे.

आज बस कंडक्टर पासून ते अंतराळवीर पर्यंत सर्व क्षेत्रात आपले अस्तित्व सिध्द केले आहे. आज स्त्रीया स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत. त्यांना हक्कांची जाणीव झाली आहे. आज स्त्रीया सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत.

आज स्त्रीया सर्व क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत. त्यांना हक्कांची जाणीव झाली आहे. आज स्त्रीया सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा !!

धन्यवाद ! जय हिंद ! जय भारत !
🙏जय महाराष्ट्र !!🙏

8 march mahila din speech in marathi २०२२ / women’s day bhashan in marathi / mahila din bhashan marathi

“सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!”

पूर्वीपासून आपल्या समाजात देवींना उच्च स्थान आहे. जेवढे देव तेवढ्याच देवींना मानणारा माझा समाज, भाषणाच्या व कुठल्याही कार्याच्या अगोदर देवीच्या नावाने सुरुवात करणारा माझा देश, देवाच्या पुढे लोटांगण घालण्या च्या गोष्टी सांगणारे हे जग. आज मात्र मुलींना जीवंतच ठेवत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. स्वतःच्या मुलांसाठी काळजाची वात करणारी आई, मोठ्यांना आवडणारी पत्नी, भावासाठी काही करायला तयार असणारी ताई. ह्या सगळ्याच हव्यात पण मुली नको हे माझ्या चिमुकल्या मनाला कळतच नाही,प्रगाड पांडित्य दाखवणारे हे जग केवळ शारीरिक क्षमतांवर ताकत ठरवते. खरे पाहिले तर स्त्रीमध्ये पुरुषांपेक्षा शारीरिक व भावनीक क्षमता या अधिक असतात. पण विज्ञानाला डोक्याला घेणारे हे लोक स्त्रियांना कमजोर समजतात. म्हणून म्हणावेसे वाटते.

“होणार असेल मुलगी तर पोटावर येतोच पाय पण दिवाच हवा वंशाला तर ती जगली काय अन् मेली काय?”

अशी विदारक परिस्थिती भारतात आहे. महाराष्ट्राचा विचार करता विकसित म्हटलं जाणारे हे राज्य दिवा स्वप्नच होय. कारण पत्तीदेवांना लागणारी पत्नी मिळणार नाही. एवढी ज्वलंत परिस्थिती महाराष्ट्रात आहे. ६ ते १४ वयोगटाचा विचार करता प्रत्येक हजार मुलांमागे फक्त ८८३ मुली आज समाजात आहे म्हणून म्हणावेको वाटते.

सावित्रीचा वारसा आम्ही कोणत्या तोंडाने सांगायचा
स्त्रीभृण हत्येचा शाप कुठवर महाराष्ट्राने मिरवायचा
जगात अनेक धर्म आहे
प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान वेगळ आहे.

भुतकाळापासूनच स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होत आहे. अहो, सीतामातेसही अग्नीपरीक्षा दयावी लागली. द्रौपदीला दुःशासनाने सभेत अपमानीत केले. पूर्वीपासून आतापर्यंतच्या स्त्रिया धोरणी, व्यवहारी, मुत्सद्दी, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व जपणाऱ्या होत्याच. पण पूर्वीच्या काळात त्यांची मुस्कटदाबी होई. त्यांच्यात गुण नव्हते का? परंतू कोणत्याही गुणांना प्रोत्साहन मिळावे लागते, तरच ते गुण उभारी घेतात. जिजाऊसारखी धोरणी माता, झाशीच्या राणी स्वाभिमानी राजकारणी होत्याच. पण ते ठरावीक स्तरात, म्हणून तर सर्वसामान्य स्त्रियांना पुढे आणण्यासाठी सावित्रीबाईपुढे आल्या. आपल्या संसाराची जराही पर्वा न करता त्यांनी स्वतः शिक्षणाचे धडे गिरवले व सर्वांना पवित्र ज्ञानदानाचे कार्य केले.

“म्हणतात ना.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी.”

एकीकडे राजघराण्यातील मोठमोठ्या स्त्रिया होत्या, ज्यांना मोठेपणाच्या नावाखाली सर्वांपुढे येण्याला राजमान्यता नव्हती. पण तरीही प्रत्येक कसरत कौशल्याने पार पाडणे हे स्त्रियांना जणू जन्मापासूनच माहीत असते. कौशल्यासारखी माता एकीकडे व स्वतःचे हित बघणारी कैकेई एकीकडे!

या सर्वोपुढे जिजाऊ जिन आदीमायेच्या साथीने आपल्या मुलाला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्यांनी स्वतःच्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण देशाचे हित साधले!

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात बरीच उदाहरणे पाहायला मिळतात. स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कधी आपले राज्य परकीयांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून प्रयत्न केले, तर कधी मुत्सद्दीने राज्य काढूनही घेतले. झाशीच्या राणीने आपले बाळ जे अगदी लहान होते, त्याला पाठीवर घेऊन लढाई केली. कालच्या स्त्रियांमध्ये सर्व गुण होते. पण ते व्यक्त करण्याची योग्य दिशा नव्हती.

आजकाल जवळजवळ प्रत्येक घरातील स्त्री वैचारीक, आर्थिक, मानसिकरित्या स्वतंत्र आहे. ती आपलं, आपल्या कुटुंबाचं, समाजाचं हित व ऋण व्यक्त करण्यासाठी काही ना काही तरी कार्य करते. कोणी राष्ट्रपती, कोणी मुख्यमंत्री कोणी शास्त्रज्ञ, कोणी शिक्षिका, पोलीस, डॉक्टर, उत्कृष्ट व्यावसायिका आणि बरच काही…

“शास्त्रज्ञ डॉक्टर बनलीस तू. राष्ट्रपती पंतप्रधानपद भूषविले, सोडीले न एकही क्षेत्र अंतराळही तू पार केलंस.”

आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आजची स्त्री आर्थिक, वैचारीकरित्या स्वावलंबी आहे. झाशीच्या राणीने सुध्दासाठी बाळाला पाठीवर बांधले. प्रत्येक जबाबदारी सांभाळण्यासाठी,पडणारी कामे आणि नोकरीत जबाबदारी पेलवायची पदे या सर्वांना कर्तृत्वाने पुढे नेणारी आजची स्त्री होय.काळ बदलेल पण ती मात्र माघार न घेता पुढे पुढे जातेय…. जात राहील.

स्त्री विना घराला घरपण नाही, ज्या घरात स्त्री नाही ते घर, घर असल्यासारखं वाटतच नाही. स्त्री मध्ये घराला जोडून ठेवण्याची अनोखी शक्ती असते.

… अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा.🙏

FAQ

जागतिक महिला दिवस कधी आहे २०२२?

८ मार्च २०२२ ला जागतिक महिला दिन आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे उद्दिष्ट काय आहे?

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करणारा जागतिक दिवस आहे. हा दिवस लैंगिक समानतेला गती देण्यासाठी कृती करण्याचे आवाहन देखील करतो.

जागतिक महिला दिवस सर्वात पहिले कोणत्या देशाने साजरा केला?

संयुक्त राष्ट्र संघाने 1975 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला.

अधीक वाचा 👇👇👇

महिला दिवस शुभेच्छा मराठी

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ जागतिक महिला दिन भाषण मराठी | Women’s day speech in marathi | Jagtik mahila din bhashan marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही जागतिक महिला दिन भाषण असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद..🙏

Please :- आम्हाला आशा आहे की जागतिक महिला दिन भाषण मराठी | Women’s day speech in marathi | Jagtik mahila din bhashan marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….🙏

नोट :  जागतिक महिला दिन भाषण मराठी / Jagtik mahila din bhashan in marathi
………. या आजच्या पोस्टमध्ये जागतिक महिला दिवस मराठी भाषण ,women’s day speech in marathi , mahila diwas bhashan in marathi ,mahila diwas speech in marathi , women’s day bhashan in marathi , women’s day speech in marathi for students , Women’s Day anchoring script in Marathi, anchoring script for women’s day celebration in marathi ,mahila diwas speech in marathi pdf ,women’s day speech in marathi for students in school ,women’s day bhashan in marathi for girl
, etc. बद्दल तुमचे मत कंमेन्ट 👇 च्या माध्यमातून जरुर दया.👍