जागतिक महिला दिन निबंध मराठी २०२२ | National women’s day essay in marathi | jagtik mahila diwas nibandh marathi.

शेअर कर मित्रा

जागतिक महिला दिवस निबंध मराठी / National women’s day essay in marathi 2022.

National women's day essay in marathi

जागतिक महिला दिवस निबंध मराठी : जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. 2022 महिला दिनानिमित्त महिला दिनाचा निबंध / women’s day essay in marathi तुमच्यासोबत शेअर करत आहे. महिला दिन 2022 च्या निबंधामध्ये, महिला दिन केव्हा असतो?, का आणि कसा साजरा केला जातो आणि त्याचा इतिहास काय आहे ? हे आपल्याला कळेल, त्याआधी, महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि महिला दिवस शुभेच्छा.

जागतिक महिला दिवस निबंध मराठी / Jagtik mahila diwas nibandh in marathi 2022.

“तुझ्या उत्तुंग भरारीपुढे, गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली, विश्व सारे वसावे.”

‘स्त्री’ प्रत्येक कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असते. स्त्री शिवाय कुटुंब पूर्ण होऊ शकत नाही. कुटुंबाशिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक स्त्री ही मुलगी, पत्नी, आई, मावशी, आजी अशा अनेक भूमिका जबाबदारीने पार पाडते.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेऊन संसाराचा गाडा यशस्वीरीत्या पुढे चालवण्याची ताकद एका स्त्रीमध्ये असते. अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या सन्मानार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ८ मार्च १९०८ साली अमेरिकेतील कामगार स्त्रियांनी केलेल्या इतिहास कामगिरीच्या स्मरणार्थ क्लारा झेटगी या कार्यकर्तीने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

तेंव्हापासून ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सर्व स्त्रिया हा दिवस सन्मानाचा व अभिमानाचा दिवस म्हणून उत्साहात साजरा करतात. या दिवशी कर्तृत्ववान महिलांचा, समाजात मोलाचे काम करणाऱ्या स्त्रियांचा सत्कार केला जातो. महिला गटातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व महिला हा दिवस हक्काचा दिवस म्हणून आनंदाने साजरा करतात.

आज स्त्री समाजातील प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. ग्रामसेविकेपासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे. एवढेच नव्हे तर शिक्षिका, पोलीस, डॉक्टर, खेळाडू अशा सर्व क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी केली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे मानले जाते. प्रत्येक संकटात स्त्री संपूर्ण कुटुंबाची ढाल बनते.

सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, मदर तेरेसा, सिंधुताई सपकाळ, प्रतिभाताई पाटील, पी. टी. उषा अशा अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. आधुनिक काळात स्त्रिया प्रगतीपथावर असल्या तरीही आजही स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अंधश्रद्धा, लैंगिक अत्याचार इ. अनेक समस्यांमुळे स्त्रियांचे जीवन धोक्यात आहे.

समस्यांचे निर्मूलन करून स्त्री-पुरुष समानता समाजात आचरणात आणायला हवी. प्रत्येक स्त्रीला समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी सर्वांनी स्त्रीला प्रोत्साहन दिले पाहिजे. थोर स्त्रियांचे विचार मनात ठेऊन प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर बनायला हवे. कुटुंबातील महिलांच्या विकासामुळे देशाचा विकास होईल. महिला स्वातंत्र्य हेच महिला दिन साजरे केल्याचे खरे सार्थक आहे.

अधिक वाचा 👇👇👇

महिला दिवस भाषण मराठी

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ जागतिक महिला दिन निबंध मराठी | women’s day essay in marathi | jagtik mahila diwas nibandh marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही जागतिक महिला दिन निबंध असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद..🙏

Please :- आम्हाला आशा आहे की जागतिक महिला दिन निबंध मराठी | women’s day essay in marathi | jagtik mahila diwas nibandh marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….🙏

नोट :  जागतिक महिला दिवस निबंध मराठी / National women’s day essay in marathi 2022.
………. या आजच्या पोस्टमध्ये Women’s day essay in marathi, महिला दिन निबंध मराठी , Women’s day information in marathi, जागतिक महिला दिन माहिती मराठी, महिला दिन घोषवाक्ये मराठी , Women’s day day nibandh in marathi , Women’s day day short essay in marathi, महिला दिनावर लघु निबंध मराठी, women’s day essay in 10 line, women’s day slogans in marathi, jagtik mahila diwas nibandh in marathi ,women’s day essay in marathi language ,women’s day essay in marathi language 10 lines ,women’s day essay in marathi language 10 lines short paragraph ,women’s day essay in marathi 100 words ,women’s day essay in marathi 150 words
, etc. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.👍


शेअर कर मित्रा