100+ मराठी उखाणे नवरदेवासाठी | Navardevache ukhane in marathi | Marathi ukhane for male.

नवरदेवासाठी मराठी उखाणे / Marathi Ukhane For Groom

नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या मराठी उखाणे नवरदेवासाठी / Navardevache ukhane in marathi पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे.लग्नामध्ये नवरदेव – नवरीला उखाणे घेण्यासाठी आग्रह केलाच जाती.त्यात तुम्ही नवरदेव असताना अशा आनंदाच्या क्षणी तुम्हाला छान ,विनोदी, स्मार्ट असे नवीन उखाणे पाठ असणे आवश्यक आहे.आजच्या पोस्टमध्ये पुरुषांसाठी मराठी उखाणेचा / Marathi ukhane for male तुम्हाला नवीन संग्रह पाहायला मिळेल.

Marathi ukhane for male च्या संग्रहात तुम्हाला सत्यनारायण पुजेसाठी उखाणे पाहायला मिळतील.त्याच बरोबर काही विनोदी उखाणे पुरुषांसाठी घेऊन आलो आहोत, ज्याच्या साहयाने तुम्ही तुमच्या बायकोची उखाणे मध्ये मज्जा घेऊ शकता.Marathi Ukhane For Groom पोस्टमधून तुम्ही छानसा उखाणा लक्षात ठेवा आणि तुमच्या लग्नात आणि गृहप्रवेशच्या वेळेस घ्या. तुमच्या लग्नासाठी अभिनंदन आणि all the best पाहुणे मंडळींमध्ये उखाणा घेण्यासाठी!

मराठी उखाणे नवरदेवासाठी / Navardevache ukhane in marathi

Navardevache ukhane in marathi

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….
च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.💞

आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर 🏠
, … च्या आगमनाने पडली त्या सुखात भर🥰.

पर्जन्याच्या वृष्टीने 🌧️ सृष्टी होते हिरवी गार, …
च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार 📿,

सोण्याचा दिवा, 🔥कापसाची वात,
आयुष्य भर देईन, ……ची साथ.🤗

नवरदेवासाठीचे नवीन उखाणे / New Marathi Ukhane For Groom

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ⛵……
चे नाव घेतो सर्वजण ऐका.😎

आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, …
चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.😍

सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव, ……….
च्या मेहंदीत, माझे नाव.🤩

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, …
बरोबर बांधली जीवनगाठ.😘

गर गर गोल, फिरतो भवरा, ……
च नाव घेतो, मी तिचा नवरा.

पुजेसाठी उखाणे नवरदेवासाठी / Marathi ukhane for male satyanarayan pooja

चंदनाच्या झाडाला 🌳 नागिणीचा वेढा, सौ. ……..
चा आणि माझा जन्मो-जन्माचा जोडा.🥰

ऊन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर, 🌊साथ देईन
………….. ची, आयुष्याच्या वाटेवर.🛤️

जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा,
सुखी संसारात सौ. ……… चा अर्धा वाटा.

राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, …..
शिवाय माझं, 🤩जीवनच व्यर्थ.

सीतेसाठी रामाने, रावणाला मारले, ……..
च नाव, मी ह्रदयात कोरले.💞

Marathi ukhane for male

Marathi ukhane for male

श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची 🌈 रंगत न्यारी, …
च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.

…….आणि ……ची जमली आता जोडी,
लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी.🙏

सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, …
राणी माझी घरकामाता गुंतली.🔥

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………
चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर … सारथी.

मराठी उखाणे नवरदेवासाठी फोटो / ukhane navardev images in marathi

ukhane navardev images in marathi

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..
झाली आज माझी गृहमंत्री.👸

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,………
चे बरोबर बांधली जीवन गाठ.

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, …
देतो मी लाडवाचा घास.

हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, …
च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.🌹

Marathi Ukhane for Groom Marriage

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, …
चे नाव घेतो लग्नाच्या राती.

अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ……
माझी सर्वांपेक्षा सुंदर.

मातीच्या चुली घालतात घरोघर, …
झालीस माझी आता चल बरोबर.

Marathi Ukhane Navardevasathi

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते
एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात
कोरली गेली एकमेव फ्रेम.

हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे,
…..’मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.🥰

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………
चे नाव घेऊन सोडतो कंकण.

चंद्रला पाहून भरती येते सागराला, …
ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.

स्मार्ट मराठी उखाणे नवरदेवासाठी / Smart Marathi Ukhane for Groom

आपल्या देशात करावा मराठी भाषेचा मान, …
चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,
……..तू फक्त, मस्त गोड हास.😁

स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …
चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,

श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण, …
ला सुखात ठेवीन हा माझी पण.

पोर्णिमेचा चंद्र असतो गोल …….
समोर माझ्या पैशाला पण नाही मोल.

Marathi ukhane male funny

बशीत बशी कप बशी,…….
सोडून बाकी सगळ्या म्हशी.💃

पाहताच ………ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ……
चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

रोज …………म्हणून सारखी नावाने हाक मारतेस,
काय ग उखाणे घेताना कशाला खोटे लाजतेस.

………..च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
……….ला पाहून, पडली माझी विकेट.

Best Marathi Ukhane for Groom

गाडीत गाडी डेक्कन क्वीन, …….
आहे माझी ब्युटी क्वीन.💃

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..
चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

प्रसन्न वदनाने आले रविराज, …
ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.

स्वरांचा सुर, सुरांची गायिकी, ……
समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.

मराठी लग्नातील उखाणे नवरदेवासाठी

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ……
मला मिळाली आहे अनुरूप.

सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, …
चे नाव घेतो … च्या घरात.

निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.

देवळाला खरी शोभा कळसाने ⛳ येते, …
मुळे माझे गृहसौख्य दुनावते.

ukhane in marathi for male

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……
सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

……….आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड,
आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड.

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, …
माझी नेहमी घरकामात दंग,

तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. …
चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल

Mulansathi Ukhane

टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, …
चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.

कोरा कागज काळी शाई, …
ला रोज देवळात जाण्याची घाई.

जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी …
म्हणजे लाखात सुंदर नार,

… माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर
घरी आणली … ही कान्ता.

विनोदी उखाणे पुरुषांसाठी / Navardevache ukhane comedy

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
………….तू मला, सुपरवूमन वाटतेस.

काल झालं आमचं लग्न
लग्नात आला होता बँड वाला
……. नाव घेतो झुकेगा नहीं साला!😅

एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..
चे नाव घेतो डोक नका खाऊ.

भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, …
चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.

दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी …
व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.

पुरणपोळीत तुप असावे साजुक, …….
आहेत आमच्या फार नाजुक.

लोकांनी आणला, प्रेमाचा आहेर, माझ्या प्रेमात
………. विसरेल तिच माहेर.🤪

Smart Marathi Ukhane Male

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी …
नाजुक जसे गुलाबाचे फुल.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, …
चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.

पक्षांचा थवा, दिसतो छान, ………
आली जीवनात, वाढला माझा मान.

चावट उखाणे पुरुषांसाठी / Marathi ukhane male chavat

सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल,
संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.

साधे उखाणे पुरुषांसाठी / Ukhane marathi male simple

भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.😊

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….
चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, …
आहे माझे जीवन-सर्वस्व.

प्रेमाच्या राणात, नाचतो मोर, .
……..शी केल लग्न, नशीब माझ थोर.

Marathi ukhane for male romantic

काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात,
प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात,

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,……
ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.

जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, …
च्या सहवासात झालो मी धुंद.

चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, …
दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.

Navardevache funny ukhane

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,…….
माझी बायको आहे मोठी लुच्ची.😅

रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळीसावळी तर … माझी प्यारी.

पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय, …
ला आवडते नेहमी दुधावरची साय,

रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, …
ला पाहून चंद्र-सुर्य हसे.

Ukhane in marathi for Boy

निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, …
चे नावं घेतो… च्या घरी.

दही चक्का तुप, … आवडते मला खुप.

श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, …
गेली माहेरी की होतात माझे हाल.

देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, …
शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.

Marathi ukhane for male non veg

टॉवर वर टॉवर जिओचा टॉवर
…………. नाव घेता मला येते पॉवर.😎

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा,
……..च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

उंदीर राहतो, ती जागा असते बीळ, घायाळ करतो
……………. च्या गालावरचा तीळ.

अधिक वाचा 👇👇👇

नवरीसाठी उखाणे मराठी 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ 100+ मराठी उखाणे नवरदेवासाठी | Navardevache ukhane in marathi | Marathi ukhane for male.
…………… तुमच्या कडे आणखीन काही शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद..🙏

Please :- आम्हाला आशा आहे की 100+ मराठी उखाणे नवरदेवासाठी | Navardevache ukhane in marathi | Marathi ukhane for male.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  नवरदेवासाठी मराठी उखाणे / Marathi Ukhane For Groom
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी उखाणे नवरदेवासाठी , Navardevache ukhane in marathi , Marathi ukhane for male ,Marathi Ukhane For Groom ,नवरदेवासाठीचे नवीन उखाणे , New Marathi Ukhane For Groom,पुजेसाठी उखाणे नवरदेवासाठी , Marathi ukhane for male satyanarayan pooja ,मराठी उखाणे नवरदेवासाठी फोटो , Marathi ukhane navardev images in marathi ,विनोदी उखाणे पुरुषांसाठी ,Navardevache ukhane comedy ,Best Marathi Ukhane for Groom , इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment