संत नामदेव महाराज पुण्यतिथी | ६ ऑगस्ट दिनविशेष | 6 August special day marathi | 6 August current affairs in marathi.

६ ऑगस्ट दिनविशेष / 6 August dinvishesh in marathi.

आजच्या आपल्या ६ ऑगस्ट दिनविशेष च्या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे.६ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना,मृत्यू,जन्म, महत्वाचे विशेष भारतीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस याबद्दल आजच्या पोस्टमध्ये माहिती मिळेल.तसेच ६ ऑगस्ट ला संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आहे ,त्यानिमित्ताने संत नामदेव महाराज पुण्यतिथी स्टेटस,बॅनर,मेसेजेस,इत्यादीचा समावेश केलेला आहे.

संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी बॅनर -फोटो / sant namdev maharaj punyatithi image-banner marathi.

Sant namdev maharaj punyatithi message marathi
Sant namdev maharaj punyatithi 2021

sant namdev maharaj punyatithi message-sms marathi 2021.⛳

महाराष्ट्रातील वारकरी संतकवी
नामदेव महाराज पुण्यतिथी निम्मित
विनम्र अभिवादन!

संत नामदेव महाराज सुविचार / sant namdev maharaj suvichar.⛳

नाचू किर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी | संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन.

संत नामदेव महाराज अभंग / sant namdev maharaj abhang.

अज्ञान बालक कोमाईलें झणीं । जाणे ते जननी तानभूक ॥१॥ तैसा मजलागीं होउनि कृपाळ । करी गा संभाळ अनाथाचा ॥२॥ वत्सालागीं धेनु येतसे वोरसे । पान्हा स्तनीं कैसे वोसंडती ॥३॥ नामा म्हणे तुज हें न साहे उपमा । मी कुडी तूं आत्मा केशिराजा ॥४॥

अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें ॥१॥ आपुलें ब्रीद साच करी । येक वेळा भेटी दे गा मुरारी ॥२॥ पतित पतित म्हणती मातें । पतितपावन म्हणती तूतें ॥३॥ नामा म्हणे ऐकें सुजान । नाइकसि तरि लाज कवणा ॥४॥

sant namdev maharaj punyatithi image
        संत नामदेव महाराज पुण्यतिथी फोटो

६ ऑगस्ट हिरोशिमा दिवस / Hiroshima Day.

दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी वर महायुद्धाच्या काळात हिरोशिमा वर टाकण्यात आलेले अणु बॉम्ब वर्धापनदिन प्रतीक आहे. ही भयानक घटना ६ ऑगस्ट १९४५ रोजी घडली , जेव्हा अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर “लिटल बॉय” नावाचा अणुबॉम्ब टाकला. दुसरे महायुद्ध संपवण्याच्या उद्देशाने हा अण्वस्त्र हल्ला १९४५ मध्ये करण्यात आला. ६ ऑगस्ट हा दिवस शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अणुऊर्जा आणि अण्वस्त्रांच्या धोक्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी लक्षात ठेवला जातो.

हिरोशिमा दिवसाचा इतिहास:

हिरोशिमा दिवस:   दुसरे महायुद्ध , १९३९-१९४६ पर्यंत चालले होते.अमेरिकेने जगातील पहिल्या अणु बॉम्ब जपानच्या हिरोशिमा येथे टाकण्यात आला. जपानच्या एनोला शहरावर टाकण्यात आलेला हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्याने शहराच्या 90% लोकसंख्येचा नायनाट केला , 70,000 लोकांना त्वरित आणि सुमारे 10,000 नंतर किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे मृत्युमुखी पडले.

६ ऑगस्टचे राष्ट्रीय दिवस / 6 August National Days.

राष्ट्रीय रूट बिअर फ्लोट डे -National Root Beer Float Day.
राष्ट्रीय ताजे श्वास दिवस-National Fresh Breath Day
नॅशनल विग्लर टू बोट डे-National Wiggle Your Toes Day
आंतरराष्ट्रीय बिअर दिवस – ऑगस्टमधील पहिला शुक्रवार-International Beer Day – First Friday in August
राष्ट्रीय जल बलून दिवस – ऑगस्टमधील पहिला शुक्रवार-National Water Balloon Day – First Friday in August.

६ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना:

१६६१: हेगच्या करारावर स्वाक्षरी झाली ज्यानुसार डच प्रजासत्ताकाने न्यू हॉलंड (ब्राझील) ६३ टन सोने पोर्तुगालला विकले.

१८२५: बोलिव्हियाला पेरूपासून स्वातंत्र्य मिळाले.

१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना.

१८९०: न्यूयॉर्कमधील ऑबर्न कारागृहात, खुनी विल्यम केमलर इलेक्ट्रिक चेअरने फाशी देण्यात आलेला पहिला व्यक्ती बनला.

१९०६: प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास आणि इतर काँग्रेस नेत्यांनी मिळून ‘वंदे मातरम’ वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू केले.

१९१४: पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.

१९४०: सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.

१९४५: जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.

१९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.

१९६२: जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९८६: भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म.

१९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.

१९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.

१९९६: नासाने मंगळावर जीवसृष्टीची शक्यता प्रकट केली.

१९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.

२००७: मध्य त्रिनिदादमधील एका जुन्या हिंदू मंदिराचे नुकसान झाले.

२००७: हंगेरीच्या शास्त्रज्ञांनी सुमारे आठ दशलक्ष वर्षे जुन्या देवदार वृक्षाचे जीवाश्म सापडल्याचा दावा केला.

२०१०: भारतातील जम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.

२०११: थायलंडमधील पुईया थाई पार्टीच्या यिंगलुक शिनावात्रा शुक्रवारी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

२०१२: नासाची क्यूरिओसिटी रोव्हर मंगळावर पोहोचले.

६ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१९७५: भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) शेखर गवळी यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २०२०)

१८०९: इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८९२)

१८८१: पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफील्डफार्म येथे जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९५५)

१९००: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २००३)

१९२५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)

१९५९: भारतीय पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांचा जन्म.

१९६५: भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा जन्म.

१९७०: भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक एम. नाईट श्यामलन यांचा जन्म.

६ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१९२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)

१९६५: संगीतकार वसंत पवार यांचे निधन.

१९९१: ईराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचे निधन. (जन्म: २६ जून १९१४)

१९९७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)

१९९९: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९४१ – सेमरी जमालपूर, माऊ, उत्तर प्रदेश)

२००१: भारतीय नौदल प्रमुख आधार कुमार चॅटर्जी  यांचे निधन.

२०१९: २५ व्या वर्षीच हरयाणाच्या कॅबिनेट मंत्री, १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री,  २००२-२००३ माहिती आणि प्रसारण मंत्री, २००३-२००४ आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री, २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं अश्या भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९५२)

Read more 👇👇👇

शुभ सकाळ शुभेच्छा

Leave a Comment