मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी झटपट घेता येतील ही गिफ्ट्स (Last Minute Birthday Gift Ideas For Best Friend)

Last Minute Birthday Gift Ideas For Best Friend.🎁

Last minute birthday gifts idea

Last Minute Birthday Gift Ideas For Best Friend:बेस्टीचा वाढदिवस म्हटलं की, एकदम खास दिवस नाही का? अगदी एक महिना आधीपासून आपण तिच्या वाढदिवसाला काय करायचं याच्या प्लॅनिंगला लागतो. पण नेमकं तो दिवस जवळ आला की, कामाच्या नादात विसरला जातो. मग अशा वेळेला झटपट काय गिफ्ट घ्यायचं हा प्रश्न मनात येतोच. आता बेस्टीचा वाढदिवस आहे म्हटल्यावर फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi) देऊन तर चालणार नाहीच. काहीतरी मस्त गिफ्ट घ्यायला हवं. यासाठीच आम्ही तुमच्या मदतीला घेऊन आलो आहोत मस्तपैकी गिफ्ट करण्यासाठी काही आयडियाज ( birthday gifts idea marathi) ज्या तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला उत्तम भेट देण्यात नक्की मदत करतील.

गिफ्ट हँपर / Gift Hamper.🎀

करण जोहरचं कॉफी विथ करण पाहिल्यापासून अनेकांना गिफ्ट हँपरचं आकर्षण वाटू लागलं आहे. बरं गिफ्ट हँपर तुम्हाला रेडीमेडही विकत घेता येतं किंवा तुमच्या आवडीप्रमाणे बनवताही येतं. यामध्ये दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. मग तुमच्या बेस्टीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तुम्ही विविध प्रकारे गिफ्ट हँपर बनवू शकता. जसं हेल्दी गिफ्ट हँपर – जर तुमची बेस्टी फिटनेस फ्रीक असेल तर तिच्यासाठी तुम्ही खास एनर्जी बार, ज्यूसेस, फळ आणि इतर हेल्दी प्रॉडक्ट्सच गिफ्ट हँपर बनवू शकता. जर ती चिप्स, चॉकलेट किंवा स्नॅक्स आवडीने खाणारी असेल तर लेज, कॅडबरी अगदी टेडी बिअर ठेवून तुम्ही क्युट गिफ्ट हँपर बनवू शकता. जर तुमचं बजेट चांगलं असेल तर कॉफी बिन्स आणि अगदी करण जोहर गिफ्ट हँपरही बनवू शकता तेही अगदी घरच्याघरी.

प्रेमाची फ्रेम/Frame With Love.📸

फोटो फ्रेम हे ऑप्शनसुद्धा अगदी सदाबहार आहे. कारण फोटोजची आवड प्रत्येकाला असतेच. त्यामुळे तुम्ही विविध आकारात तुमच्या आवडत्या फोटोजची निवड करून कस्टमाईज्ड फोटो फ्रेम बनवून घेऊ शकता. आजकाल कस्टमाईज्ड फ्रेम अगदी काही मिनिटात बनवून मिळतात. तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही डिजीटल फोटो फ्रेममध्ये तुमचे फोटोज आणि व्हिडिओज अपलोड करून तेही देऊ शकता. सध्या फोटोफ्रेमसोबत केक असं कॉम्बोही मिळतं आहे. त्याची चौकशीही नक्की करून पाहा म्हणजे फोटो फ्रेम पण आणि केक सुद्धा. तुमच्या आणि बेस्टीच्या चांगल्या आठवणींचे क्षण अशा प्रेमाच्या फ्रेममध्ये कैद करून तिला नक्की गिफ्ट द्या.

प्रेमाची मिठी / Friendship Hug.👭

नाही नाही…फक्त मिठीवर थोडी बर्थडे गिफ्ट निभावणार आहे. प्रेमाची मिठी देणारा टेडी किंवा उशीबाबत आम्ही इथे सांगत आहोत. तसंही कोरोनाच्या काळात मिठी वगैरे जरा जपूनच नाही का? असो. तर आजकाल तुम्हाला ऑनलाईन फोटो वापरून कस्टमाईज्ड उशी किंवा टीशर्ट बनवता येतो. तुम्हाला स्वतः ऑनलाईन ते शक्य नसल्यास गिफ्ट शॉपमध्ये जाऊन तुम्ही असे कस्टमाईज्ड प्रोडक्ट्स बनवू शकता. जसं तुमच्या दोघांचा छान फोटो असलेली उशी. जी तुमच्या बेस्टीजवळ सतत राहील आणि तिला तुमची आठवण करून देत राहील. तिला तुमची भेट घेता आली नाही किंवा तिला तुमची आठवण आली तर त्या उशीला तरी नक्कीच मिठी मारता येईल. नाही का?

इकोफ्रेंडली गिफ्ट / Eco Friendly Gift.🌱

तुमच्या बेस्टीला जर झाडांची आणि रोपांची आवड असेल तर तुमचा प्रश्न अगदी सहज सुटेल. तुमच्या बेस्टीला मस्तपैकी क्युट आणि इकोफ्रेंडली असं इनडोअर प्लँट. जसं हे रोपं वाढेल तसंच तुमची मैत्रीही वाढेल. तसंच यामुळे निसर्गाच्या खजिन्यातही भर पडेल. या रोपासोबत तिच्यासाठी एखादी छान नोटही लिहा. मग बघा कसं प्रेमाच्या बियाण्याने रूजलेलं हे रोपं पटापट वाढेल.

ब्युटी ट्रीट/Beauty Treat.👸

जर तुमची बेस्टी ब्युटी प्रोडक्ट्सची चाहती असेल तर तुमच्यासाठी गिफ्टचा सोपा पर्याय आहे. एक क्युट असा मेसन जार घ्या त्यात लिप बाम, हँड क्रीम आणि तिच्या आवडीचे इतर प्रोडक्ट्स त्यात भरा. यात तुम्ही एखादी क्युट नोटही तुम्ही ठेवू शकता. तिच्या आवडीचे ब्युटी प्रोडक्ट्स पाहून ती नक्कीच खूष होईल आणि तुम्हाला घट्ट मिठीच मारेल.

चार्म्सचा ट्रेंड / Trendy Charms.⌚

सध्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये सुरू आहे चार्म्सचा ट्रेंड. तुम्ही तुमच्या बेस्टीला चार्म करू शकता या ट्रेंडीग गिफ्टसोबत. चार्म्समध्ये घड्याळ्यासाठी किंवा ब्रेसलेट चार्म्सही उपलब्ध आहेत. जसं इव्हील आय चार्म्स किंवा क्युट चार्म्स तुम्ही बेस्टीला गिफ्ट देण्यासाठी निवडू शकता.

पुस्तकी किडा / Book Lover.📚

तुमच्या बेस्टीला वाचनाची आवड असेल तर तिच्या आवडीचं पुस्तक तिला गिफ्ट करता येईल. जर तुमचं बजेट असेल तर तिला किंडल गिफ्ट करून आश्चर्याचा धक्का द्या. शेवटच्या क्षणी गिफ्ट द्यायचं असेल तर पुस्तक हा खूप सेफ पर्याय आहे.

हँडमेड गोष्टी/ Handmade Gifts.🎎

जर तुमच्याकडे तरीही काही वेळ हातात असेल तर तिच्यासाठी तुमच्या हाताने एखादं ग्रीटींग बनवा, घरच्याघरी एखादी मस्त सेटेंड कँडल किंवा सोप्स बनवा. तिला सरप्राईज करण्यासाठी या छोट्या गिफ्ट्सचीही मदत तुम्हाला नक्कीच होईल. कारण त्यात तुमची मेहनत आणि प्रेम दोन्ही असेल.

फॅशनिस्ता मैत्रिणीसाठी / Fashionista Friend.🛍

जर तिला फॅशनची आवड असेल तर तिला सरप्राईज करा तिच्या आवडत्या ब्रँडच्या टॉप,टीशर्ट किंवा बॅग्ज्स गिफ्ट करून. मस्तपैकी शॉपिंग बॅग सजवा आणि तिला द्या. तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव नक्कीच होणार.

तुम्ही बेक करा केक/ Bake The Cake.🍰

केक आणि बर्थडेचं घट्ट नातं आहे. त्यातही जर तुम्ही तुमच्या आवडत्या माणसासाठी स्वतः केक बनवल्यावर त्याचा आनंद वेगळाच असतो. सध्या तर युट्यूब आणि सोशल मीडियावर केकच्या अनेक सोप्या रेसिपीज उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला अगदी एक तासात झक्कासपैकी केक तयार करतील. यासाठी तुम्ही बेकिंगचा क्लास केलेला असलाच पाहिजे असं काही नाही. मग तुमच्या बेस्टीसाठी तुम्हीही मस्तपैकी केक बनवा आणि तिला गोड सरप्राईज द्या.

मग आम्हाला आशा आहे की, तुम्हाला तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला वाढदिवसाच्या शेवटच्या क्षणी गिफ्ट देण्यासाठी वरील आयडियाज (Last Minute Birthday Gift Ideas For Best Friend) नक्कीच उपयोगी पडतील.

Read more 👇👇👇

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday wishes in marathi.

Leave a Comment