love poem collection in marathi / मराठी प्रेम कविता संग्रह
![]() |
Love poem in marathi |
प्रेम ही एक अशी भावना आहे की व्यक्त करावी लागते.प्रेम व्यक्त करताना प्रेमाचे स्टेटस आपण आपल्या व्हाट्सअप्प वर आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवून आपण आपलं प्रेम व्यक्त करत असतो.जर तुम्ही प्रेमावर कवितांचा शोधात असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात.आज आम्ही तुमच्यासाठी प्रेमावर कवितांचा संग्रह घेऊन आलो आहोत. यामध्ये romantic love poem,sad love poem, love poem for husband and wife,poem on love life (prem kavita इत्यादीचा कविता संग्रहात समावेश केलेला आहे.आम्हाला आशा आहे की, तुम्हाला हा प्रेम कवितांचा संग्रह नक्की आवडेल.
Read more👇👇👇
Valentine Day status marathi
विरह प्रेम कविता
तुझ्या आठवणी म्हणजे...
मोरपिसाचा हळुवार स्पर्श...🍁
तुझ्या आठवणी म्हणजे...
नकळत निर्माण होणारा हर्ष...😊
तुझ्या आठवणी म्हणजे...
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव...🌃
तुझ्या आठवणी म्हणजे...
विरह सागरात हरवलेली नाव...⛵
Marathi love poem short
Marathi love poem sad
Romantic love poem in marathi / रोमँटिक प्रेमावर कविता मराठी 👩❤👩
![]() |
Romantic love poem marathi |
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल.
प्रेमाच्या या सरितेत
वाहत असेच जावे
उगवत्या सुर्यासोबत
प्रेम सागरास जावून मिळावे
प्रेम म्हणजे... ?
समजली तर भावना...
पाहिले तर नाते...
म्हटले तर शब्द...
वाटली तर मैत्री...
घेतली तर काळजी ...
तुटले तर नशीब....
पण मिळाले तर स्वर्ग....!!!
घेऊत मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलंय
आता तूच समजावं याला.
तू आहेस सोबत म्हणूनच
शब्द बोलत आहेत
अबोल्याचे क्षण त्यांनी
कित्येक दिवस पाहिले आहेत.
नयन ओले माझे
तुझ्या आठवणींच्या ओलाव्यात
शांत होते मन
पाहुनी प्रतिमा तुझी अंतर्मनात.
आठवून तुला
मनाचा दर्पण सजला
पाहून तुझी सुंदरता
तो क्षणही लाजला.
पाऊस थांबला होता
अश्रू थांबत नव्हते
विरहाचा भार ते
स्वतः झेलत होते..
विरह प्रेम कविता
घटका विरहाची भरली
विरहाची सांगता होत आहे
तुझ्या माझ्या प्रेमाचा बंध
नव्याने एक होत आहे.
सांगायचे होते तुजला
खेळ ते विरहाचे होते
क्षणात नाते आपले
विलग झाले होते.
कसे सांगू तुजला
मी ही विरहात जळत आहे
एकांताला समजावताना
आठवणी तुझ्या माळत आहे.
मनातलं सर्व माझ्या तिला
केव्हापासून सांगायचं होतं
सांगताच ती लाजून म्हणाली
मला तर आधीच माहीत होतं.
कोरे ठेऊन पान मनाचे
आठवणीत का बोलतेस
बंद दरवाजे मिलनाचे
स्वप्नातच का भेटतेस.
तुझी मिठी म्हणजे
चंद्र चांदण्यांचा भास
मिलन ह्रदयाचा व्हावं
एकत्र येऊन तुझा-माझा श्वास..
मनाच्या खोल कुठेतरी
विचारांचं खळबळ माजलयं...
विरहाचं धुकं नात्यात दाटलयं
अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी
तुला दिलेल्या एका वचनापायी
गालांवरच्या खोट्या हास्यात मी त्यांना अडवलंय.
टिक टिक घड्याळाची करिते क्षणांस जाचक,
होत नाही महन ते एकटेपण,
आठवणींच्या दुनियेत रमून,
होते भूतकाळाचे चित्रीकरण नयन मिटताच....
ते रूप तुझे,तो सहवास तुझा,ते दुःख तुझे,
ती काळजी तुझी,
जणू भासते ती व्हावी आत्ताच परिधान,
पण अणूंचा गोंधळ माजुन वाहतो
थेंबांचा प्रवाह नयन उघडताच...
love poem for wife & girlfriend.
![]() |
Love Poem for wife |
तुझ्या आठवणी म्हणजे...
मोरपिसाचा हळुवार स्पर्श...🍁
तुझ्या आठवणी म्हणजे...
नकळत निर्माण होणारा हर्ष...😊
तुझ्या आठवणी म्हणजे...
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव...🌃
तुझ्या आठवणी म्हणजे...
विरह सागरात हरवलेली नाव...⛵
रात्रीस झोपी जाता,कानात ध्वनि
गुंजतो फक्त तुझा,
नयन बंद करताच समोर येते तुझे सुंदर रूप,
तेव्हा दचकून जाग येताच पाहतो
चंद्रमय प्रकाश....
त्या प्रकाशाच्या सहवासात राहतो,
तेव्हा होते हृदयाची धडधड कमी,
कारण तो प्रकाश पडतो सतत अन
पुष्टी होते तुझ्यासोबत आहे
आयुष्याचा प्रवास...
पाहतेस अशी तू
माझ्याकडे
हिरावून घेतेस
कटाक्ष माझा
शब्द मनातले
शोध घ्यावा
लागतो मला नंतर
माझ्या हरवलेल्या
मनाचा.
शृंगार तुझा असा
पाहून तो चंद्र ही लाजेल
अपूर्ण सौंदर्य त्याचं
तो तुझ्यात शोधेल.
माझ्या प्रेमाच्या फुलाला
आधार तुझा हवा
नेमका प्रेमाचा अर्थ
जगाला तुझ्यामुळेच कळाला.
तो वारा नदी काठचा
अजूनही शहारे आणून देतो
गोड आठवणी जुन्या
परत आठवून देतो आठवणी गावाकडच्या....
इतका पण हळवा
नव्हतो मी कधी....
तूच किनारा
तूच वारा
डोई आसमंत निळा
भोवताली तुझीच छाया....
love poem status for whatsapp
माझ्या मनातलं प्रेम...
तुला कॉल करू शकत नाही पण
तुझी केअर करायला खुप आवडत..
तुला मॅसेज करू शकत नाही पण
तुझा विचार करायला खुप आवडत..
तुला रोज भेटु शकत नाही पण
तुला मिस करायला खुप आवडत...
कस मी सांगु तुझ्यावर प्रेम..
मी आहेच सोबत तुझ्या
तू नको काळजी करू
एकमेकांच्या प्रेमात वाहून
नवी प्रेम कहानी लिहू.
खरंच.
तू दररोज आनंदी राहावं,
असं मनाला वाटत,
नको जाऊस सोडून,
कारण
तुला पाहून..
अजुन जगावस वाटत..
निरपेक्ष प्रेम असतं काय
तुझ्यामुळेच मला समजलं
माझं नावं तुझ्या नावाशी
तेव्हांच आहे मी जोडलेलं !
शब्दांनुभव
प्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक क्षणी तुलाच मी पाहिलं
हृदयरुपी पुष्प माझं तुलाच फक्त मी वाहिलंय.
झूळझुळ वाहे वारा
मंदमंदचाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.👌
तुझे रुप असे....
हिरवा रंग तो असा
तुझ्या सौंदर्यात सजला
कौतुक करताना तुझं
चंद्र कधीच नाही थांबला
वाटतं आभाळालाही
तुला स्पर्श करावं
घेऊन तुला मिठीत
अवकाशात घेऊन जावं
इतकी सुंदर तू..
Marathi love poem short
रुसवे फुगवे
हे पुरावे प्रेमाचे
तुला मानवण्या
थोडे हे बहाणे मनाचे..
त्या प्रेमाच्या गावात
दोघेही जाऊ
प्रेम करताना दोघे
प्रीत नव्याने लिहू...
हृदय एक आपुलं
त्यास एकाच स्पंदनांची साथ
उंबरा ओलांडून बंधनांचा
लिह प्रेमाची नवी बात.
कोवळ्या मनातून वाह तो
तुझ्या प्रीतीचा झरा
होतो बेधुंद वारा
घेऊन आसमंत सारा.
कृष्ण येईल तुझा लवकर
नको वाट पाहू स इतकी
विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर
प्रीत जुळून येईल नक्की.👍
तुलना करणं तुझ्याशी
कुणालाच शोभत नाही
तुझ्या सारखा रंग असा
त्या इंद्रधनतही नाही .
Marathi love poem sad
आजही मन माझे
खूप उदास,
अजून होतो तुझ्या
त्या,
आठवणींचाच
आभास..
होत नाही आजहीं
विश्वांस,
खरंच तुझ्यात गुंतला
आहे माझा श्वास.
अजून होतो तुझ्या
त्या,
आठवणींचाच
आभास..
होत नाही आजहीं
विश्वांस,
खरंच तुझ्यात गुंतला
आहे माझा श्वास.
आज ती परत आली
चूक तिने तिची मान्य केली
पण आता काय उपयोग
आता वेळ निघून गेली .
काळजीचा ठोका येतो
प्रत्येक स्पंदना मधी
शब्द मनातले
कसे सांगू तू दूर असता
होते काय अवस्था माझी
पर्ण जरी हलले वृक्षाचे
तुला पाहतो मी आधी.…
बदलता ऋतु हा
तुला आठवायला निमित्त देतो
आठवणीतला शब्द
तुझ्यावर कविता करून जातो..
क्षणोक्षणी वाढतं
यातनेचं ओझं मनावर
सुखाचा काळ कधी येईल
चालताना जीवनाच्या वाटेवर..
Love poem for husband
वेचते मी क्षण
मिळतात श्वास तुझ्यातले
करावा दूर आसव दुराव्याचा
जोडून भाव मनातले.
अंग तिचे शहारले होते
मन तिचे बावरले होते
चेहऱ्यावरच्या बटांना मी
ओठांनी सावरले होते
शब्द मनातले
गुंतली होती ती माझ्यात
विसरून गेली ती भान सारे
देह भिन्न आमचे पण
हृदय एक आम्हा जाणवले होते.
अचानक मिठीत घेता
मज तू साजणा
शहारुन जातं मन माझं
होऊन जीव बावरा...
हुरहूर मनाची वाढलेली
कशी सांगू मी तुला
तुझ्या मिठीत येता सखे
स्पंदनास श्वास तुझा भेटला...
विचारांच्या गर्दीत मनाच्या
भावना होत्या मनात साचल्या
कविता लिहिताना तुझ्यावर
त्या ओळी ही वाहू लागल्या..
विश्वास नात्याचा आधार असावा
तिथं नसावा शंकेला किंचितही थारा....
अंगणी तुझ्या मी पणती सम प्रकाशा
येता अविश्वासाचं वादळं....
तुझ्या हातांनी अलवार मला सावरावं ..
सवय लागलीय तुझ्यावर
प्रेम करायची सुटता
सुटेना, शेवटी ठरवल
विसरुन जायचं तुला, पण
तुझ्यावाचून जगणं ही जमेना.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी प्रेमावर कविता आणि प्रेम कविता स्टेटस मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की love poem in marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍
नोट : love poem in marathi / प्रेमावर कविता मराठीमध्ये
या लेखात दिलेल्या virah love poem, love poem for husband and wife,love poem for whatsapp,sad love poem मराठीमध्ये, .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
या लेखात दिलेल्या virah love poem, love poem for husband and wife,love poem for whatsapp,sad love poem मराठीमध्ये, .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
1 Comments
All poems are heart touching..
ReplyDeleteNYC work..😍😍
धन्यवाद