Raksha Bandhan with nashik polise commissioner vishwas nangare patil/नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आयोजित राखी विथ खाकी!!!

Raksha Bandhan with nashik polise commissioner vishwas nangare patil/नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आयोजित राखी विथ खाकी!!!

१५ ऑगस्ट ला यावर्षी ७३वा स्वतंत्रा दिवस साजरा करण्यात आला.त्याच प्रमाणे यावर्षी रक्षाबंधनचा सण हि या वर्षी १५ ऑगस्ट ला आल्याने तो साजरा केला गेला.परंतु नाशिक येथील पोलीस मुख्यालयात साजरा केलेला रक्षाबंधन सोहळा खास ठरला।कारण नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कैद्यासाठी(गुन्हेगारांसाठी)रक्षाबंधन आयोजित केलेला होता.या प्रसंगी सर्व कैदा ना व सर्व पोलीस कर्मचारी यांना राख्या बांधण्यात आल्या.तसेच नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना बऱ्याच महिलांनी राखी बांधली.

Raksha Bandhan with nashik polise commissioner vishwas nangare patil/नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आयोजित राखी विथ खाकी!!!

Raksha Bandhan with nashik polise commissioner vishwas nangare patil/नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आयोजित राखी विथ खाकी!!!

रक्षाबंधननिमित्त नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची गुन्हेगारांना कवितेतून समजूत…
नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयोजित केलेल्या राखी विथ खाकी या कार्यक्रमात गुन्हेगारांसाठी कुसुमाग्रज यांची कविता म्हणले।

विश्वास नांगरे पाटील स्वातंत्र्यदेवीची विनवणी कविता

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी  गुन्हेगारांना तसेच पोलीस बांधवाना समाजातील मुलींना व महिलांना आपली बहीन माना व त्यांचे रक्षण करा असा संदेश दिला।

Leave a Comment