नाशिक येथे कैद्यांनी बनवल्या 800 + गणेश मूर्ती /800 Ganesh idols made by Nashik prisoners

 

नाशिक येथे कैद्यांनी बनवल्या 800 + गणेश मूर्ती /800 Ganesh idols made by Nashik prisoners

नाशिक येथे कैद्यांनी बनवल्या 800 + गणेश मूर्ती /800 Ganesh idols made by Nashik prisoners

संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर गणेश चतुर्थीची लगबग चालू झाली आहे।गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्व राज्यभर जय्यत तयारी चालू आहे।
गणेश मूर्तिकार हि लगबगीने गणेशमूर्ती बनवण्यास सज्ज आहेत।अशा मध्ये नाशिक मधील गणेश चतुर्थी पोलीस मध्यवर्ती कारागृहातून विशेष अशी ठरणार आहे!
त्याचे कारण ही तसेच आहे कारण येथे कैद्यानि मिळून 800+ गणेश मूर्ती बनवल्या आहेत।

नाशिक येथे कैद्यांनी बनवल्या 800 + गणेश मूर्ती आणि त्या गणेश मूर्ती नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे विक्रीस उपलब्ध आहेत।

 

नाशिक येथील एका कैदानि चक्क 800+ गणेश मूर्तीची निर्मिती हि इतर कैद्यानां सोबत घेऊन बनवल्या आहेत।
या मूर्तिकाराचे नाव सागर पवार असे आहे।
एका गुन्हा साठी तो नाशिक येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे। सागर पवार ने सुबक अशा गणेश मुर्त्या बनवल्या आहे।सागर  हा मूळचा पेन ह्या गावचा आहे।त्याची कला पहिल्या वर त्याच्या हातून काही गुन्हा झाला असेल असं तुम्हाला वाटणार नाही।
त्याची गणेश मूर्ती बनवायची आवड- कला त्याला स्वथ बसून दयाना त्यामुळे त्याने जेल प्रशासनाकडे या विषयी निवेदन केले।

त्यावर जेल प्रशासनी सकारक्तमक विचार केला ।सागर पवार हा गेले 3 वर्ष झाले मूर्ती बनवायचे काम करतोय।यंदाच्या वर्षी त्यांनी एक बारा फुटाची मूर्ती देखील बनवली आहे।
या गणेश मूर्तीना नाशिक तसेच पुणे ,मुंबई व इतर जिल्यातून हि मागणी येत आहे।त्या मुळे या 800 पैकी एक हि गणेश मूर्ती शिल्लक राहणारं नाही असं वाटतंय।
कोणताही यक्ती हा जन्मताच गुन्हेगार नसतो या गोष्टीला मागे टाकत या कैदानी मूर्ती बनवण्याचे काम केले आहे।
त्यांच्या या प्रयत्नांना जेल प्रशासनाकडून देखील मदत मिळतीय।

नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील  (२ मार्च २०१९ पासून)काय म्हणाले?

 

विश्वास नांगरे पाटील यांनी ज्या ठिकाणी मुर्त्या बनवल्या जातात त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भेट दिली। सागर पवार याच्या हाता खाली 20 बंदीजण काम करत आहेत। सागर पवार हा मूळचा पेन चा आहे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा मुर्त्या बनवण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे।जे.जे.स्कूल ऑफ आर्ट ची डिग्री त्याच्याकडे आहे।या निमित्ताने विश्वास नांगरे पाटील यांनी आव्हान केले की,या eco-friendly शाडू ची माती व कागदाच्या लगदया पासून बनवलेल्या मुर्त्या घ्याव्यात।

Leave a Comment